जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

आजोबाकडून नातवाचा खून,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी ग्रामपंचायत हद्दीत तीनचारी येथील चांदगुडे वस्तीवरील रहिवासी असलेला व्यसनी आरोपी आजोबा चंदर उर्फ चंद्रभान देवराम गोधडे (वय वर्ष -५०) यांने अज्ञात कारणावरून त्याचा नातू चि.अथर्व अनिल गायकवाड (वय-०६) यास गंभीर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी नविन आदिवासी स्मशानभुमीत त्याचे प्रेत परस्पर दफन केल्याची घटना उघड झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संकल्पित छायाचित्र.

सदर मुलाला आजोबाचा व त्यांचे नातवाचा अज्ञात कारणावरून बेबनाव झाला असता आजोबा चंद्रभान गोधडे याने आपल्या नातू अथर्व गायकवाड यास काठीने व हाताने मारहाण करून त्यास दि.३१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवघड जागी मारहाण करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे परस्पर विल्हेवाट लावली असता पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे या घटनेचा भंडाफोड झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी चंदर उर्फ चंद्रभान गोधडे हा आपल्या नातवाला घेऊन रहात होता.मयत मुलाचे वडील व आजी या पूर्वीच मयत झालेली असून आईने नवरा मयत झाल्याने काही कालावधीत दुसरे लग्न केलेले आहे. व ती दुसऱ्या नवऱ्याकडे नांदत आहे.त्यामुळे मयत मुलगा व आजोबा चंद्रभान गोधडे हे घरात दोघेच राहत होते.या कुटुंबाचे मुळगाव सिन्नर तालुक्यातील पवारवाडी हे असून आजोबा आपल्या नातवाला घेऊन एकटाच रहात होता.व तेथील शेतकरी विलास चांदगुडे यांचे शेतात शेतमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होता.

सदर मुलाला आजोबाचा व त्यांचे नातवाचा अज्ञात कारणावरून बेबनाव झाला असता आजोबा चंद्रभान गोधडे याने आपल्या नातू अथर्व गायकवाड यास काठीने व हाताने मारहाण करून त्यास दि.३१ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अवघड जागी मारहाण करून गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.व त्याचा खून केला आहे.व त्याचा पुरावा नष्ठ करण्यासाठी त्याचे प्रेत नवीन आदिवासी स्मशान भूमीत परस्पर घेऊन गेला होता.व ते दफन केले होते हि घटना कोपरगाव पोलिसांना गोपीनिय रित्या मिळाली होती.तीन नुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेचा शोध घेतला असता ती उघड झाली आहे.
दरम्यान हि घटना गावात कर्णोपकर्णी पसरली होती.त्याची खबर तालुका पोलीस अधिकाऱ्यांना लागल्याने गावातील पोलीस पाटील प्रकाश रंगनाथ शिंदे यांनीं त्यानुसार त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.तथापि हि हत्या नेमकी कशाने केली ? हे अद्याप तपासात स्पष्ट होणार आहे.

या प्रकरणी आज दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा र.क्रं.११७/२०२२ भा.द.वि.कलम ३०२,२०१ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिसना निरीक्षक सुरेश आव्हाड हे करित आहे.सदर मुलाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close