गुन्हे विषयक
मातेनेच घोटला मुलाचा गळा,पळवून नेल्याचा केला बनाव,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कारवाडी येथील दंडवते वस्ती येथील रहिवासी शेतमजूर असलेले जोडपे यांच्यात अज्ञात कारणाने भांडण होऊन त्यात महिलेने स्वतःच्या शिवम सुरज माळी (वय-५ महिने) या लहान बालकांचा गळा दाबून खून केला व त्याचे प्रेत नजीकच्या विहिरीत फेकून दिले असल्याची धक्कादायक घटना घडली असून त्या नंतर त्यास पळवून नेल्याचा बनाव रचला होता.मात्र तो नजीकचे ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघड झाल्याने तिच्यावर फिर्यादी पती सूरज शंकर माळी (वय-२३) यांने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घरगुती कारणावरून पती पत्नीत वारंवार कुरबुरी होत होत्या.अशीच कुरबुर त्यांची दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती.त्यात त्यांच्या पती-पत्नीचे भांडण झाल्यावर तिने त्याचा राग आपल्या लहान बालकावर काढला आहे.त्यातून तिने आपल्या लहान बालकांचा नवऱ्याच्या पश्चात गळा दाबून खून केला आहे.त्या नंतर आपला खून पचविण्यासाठी त्यास सुधाकर दंडवते यांच्या नजीकच्या विहिरीत फेकून दिले होते.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी सुरज माळी हा शेतमजूर असून तो माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते यांच्या शेतात आपल्या वडीलापासून शेतमजूर म्हणून काम करत आहे.त्या ठिकाणी हे जोडपे गत दोन वर्षांपासून राहत असून आपला उदरनिर्वाह करत आहे.त्या जोडप्याचे साधारण दोन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याची पत्नी म्हणून गायत्री माळी हि आपल्या सासरी आली होती.तिचे हे दुसरे लग्न असल्याचे समजते.
दरम्यान त्यांच्या घरगुती कारणावरून पती पत्नीत वारंवार कुरबुरी होत होत्या.अशीच कुरबुर त्यांची दि.१९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती.त्यात त्यांच्या पती-पत्नीचे भांडण झाल्यावर तिने त्याचा राग आपल्या लहान बालकावर काढला आहे.त्यातून तिने आपल्या लहान बालकांचा नवऱ्याच्या पश्चात गळा दाबून खून केला आहे.त्या नंतर आपला खून पचविण्यासाठी त्यास सुधाकर दंडवते यांच्या नजीकच्या विहिरीत फेकून दिले होते.व त्या नंतर साळसुदपणाचा आव आणत आपला बचाव करण्यासाठी,”आपल्या बालकास कोणीतरी पळवून नेले असल्याचे कुभांड रचले होते.मात्र हा बनाव फार काळ टिकला नाही पती घरी आपल्यावर त्याचे बिंग फुटले आहे.त्यातून सदर महिलेचा पती सुरज माळी याने या प्रकरणी त्याची पत्नी गायत्री माळी हिच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.नोंद क्रं.०६/२०२३ भा.द.वि.कलम ३०२,२०१अन्वये काल गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे अधिकारी हे करीत आहेत.