जाहिरात-9423439946
क्रीडा विभाग

…या ठिकाणी तालुका क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

संवत्सर-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक क्रीडा संकुल या ठिकाणी तालुका क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून या स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी कु.वैष्णवी शिंदे हिने भाला फेक मोठा गट मुलींमध्ये प्रथम तर द्वितीय क्रमांक कू.वालझाडे निकिता हिने पटकावला आहे.त्यांचे महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी अभिनंदन केले आहे.

  

कोपरगाव तालुका क्रीडा स्पर्धा १५०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम क्रमांक ओम उत्तम जाधव याने पटकावला आहे तर लहान गटात ६०० मीटर धावणे यात द्वितीय क्रमांक शेखर सचिन भिवसने याने मिळवला आहे.याशिवाय तालुका क्रीडा स्पर्धा १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक आचारी तृप्ती यांनी पटकावला आहे.

कोपरगाव तालुका क्रीडा स्पर्धा नुकत्याच कोकमठाण येथील आत्मा मलिक शैक्षणिक संकुल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या आहेत.त्यात ८०० मीटर मोठा गट तालुक्यात द्वितीय क्रमांक भाकरे ज्ञानेश्वरी शरद,४०० मीटर लहान गट तालुक्यात द्वितीय क्रमांक गौरी दत्तात्रय जाधव,तालुका क्रीडा स्पर्धा मध्ये ४०० मीटर धावणे मुली मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मोठा गट भाकरे समीक्षा सचिन,२०० मीटर लहान गट मयुरी प्रभाकर जाधव प्रथम क्रमांक,लांब उडी तृतीय क्रमांक वैष्णवी संभाजी शिंदे,तालुका क्रीडा स्पर्धा थाळीफेक मुलींमध्ये प्रथम प्राची पोपट आढाव,कावेरी वरगुडे तृतीय,लहान गट गोळा फेक कु.श्रद्धा जालिंदर पांडव,तालुक्यात प्रथम क्रमांक आणि थाळीफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

कोपरगाव तालुका क्रीडा स्पर्धा १५०० मीटर धावणे मुलांमध्ये प्रथम क्रमांक ओम उत्तम जाधव याने पटकावला आहे तर लहान गटात ६०० मीटर धावणे यात द्वितीय क्रमांक शेखर सचिन भिवसने याने मिळवला आहे.याशिवाय तालुका क्रीडा स्पर्धा १०० मीटर धावणे प्रथम क्रमांक आचारी तृप्ती यांनी पटकावला आहे.

  दरम्यान या खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी सदस्य राजेश परजणे,दिलीप बोरनारे,बाळासाहेब बारहाते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल भोसले तसेच क्रीडा मार्गदर्शक व सल्लागार समिती सदस्य मधुकर साबळे तसेच चंद्रकांत लोखंडे,अशोक लोहकणे,सचिन भाकरे,रणजीत जगताप,जालिंदर पांडव,आढाव पोपट,तालुका क्रीडा अधिकारी निकम सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मोरे,पर्यवेक्षक शरद आंबिलवादे,क्रीडा मार्गदर्शक विलास मोरे,श्री वाघमारे आदींसह शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close