जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

नवरा गायब,पत्नीची कोपरगावात हरवल्याची तक्रार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपला पती आपल्यात काही कारणावरून भांडण झाल्याने आपण बहिणीकडे रुसून गेले असताना कोणालाही काही न सांगता आपली रेडिगो गाडी घेऊन निघून गेले असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्याला आपल्या जाऊबाईचा फोन आला व तिने आपल्याला सांगितले की,”माझे पती सकाळी बाहेरगावी जातो असे सांगून गेले आहे.रेडिगो कंपनीची गाडी घेऊन बाहेर गेले आहे.हि बातमी आपल्याला मिळाल्याने आपण तातडीने कोपरगाव येथील आपल्या घरी आले व या बाबत खातरजमा केली असता ती बातमी खरी निघाली आहे.त्या मुळे आपण हि फिर्याद दाखल केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि कोपरगाव शहरात आपला पती,एक मुलगी एक मुलगा असे एकत्र राहतो.आपला फुलांचे हार करून विकण्याचा व्यवसाय असून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.तथापि आपले पती व याच भागातील एक महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे आपल्या निदर्शनास आले होते.त्यावरून आमच्यात भांडण झाले होते.त्यामुळे आपण गुरुवार दि.१७ फेब्रुवारी रोजी आपल्या नाशिक येथील बहिणीकडे गेले होते.

दरम्यान शनिवार दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आपल्याला आपल्या जाऊबाईचा फोन आला व तिने आपल्याला सांगितले की,”माझे पती सकाळी बाहेरगावी जातो असे सांगून गेले आहे.रेडिगो कंपनीची गाडी घेऊन बाहेर गेले आहे.हि बातमी आपल्याला मिळाल्याने आपण तातडीने कोपरगाव येथील आपल्या घरी आले व या बाबत खातरजमा केली असता ती बातमी खरी निघाली आहे.आपण या प्रकरणी आपल्या पतीचा शोध घेऊन पाहिला असता ते मिळून आलें नाही.त्यांच्या सोबत ते रेडिगो हि गाडी (क्रं.एम.एच.१७ सि.एम.१२१७) घेऊन गेले आहे.

त्यांचा वर्ण निमंगोरा असून सरळ उभट नाक आहे.केस काळे असून शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे.कानात सोन्याची बाळी आहे.पायात साधी चप्पल आहे.या संबंधी पोलिसानी शोध घेऊन त्यांना आपल्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी हरविल्याच्या दप्तरी नोंद क्रं.१३/२०२२ केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले याचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close