जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव-रोटेगाव मार्ग पूर्ण करा-कोपरगावातून..या नेत्यांची मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव २२ किलोमीटरचा २०१७ पासून सुरु असलेला सर्व्हे आजपर्यंत पूर्ण झालेला नाही.या २२ किलोमीटच्या रेल्वेमार्गात नदी,पूल,घाट नसून संपूर्ण दुष्काळी परिसर आहे.महारेल मार्फत अर्धा-अर्धा खर्च करण्याची शासनाकडून सहमती देण्यात आली आहे.
मात्र केवळ सर्व्हे रेंगाळल्यामुळे कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनचा प्रश्न अधांतरी लोंबकळत पडला आहे.याकडे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी यांचे लक्ष वेधून त्यांच्यासमवेत कोपरगाव रेल्वे स्थानक व मतदार संघातील रेल्वेबाबतच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली आहे.

“कोपरगांव रेल्वे स्टेशन येथे जम्बो गुड्स शेड मंजूर करावे.प्रस्तावित यशवंतपूर-निजामाद्दीन-राजधानी एक्सप्रेसला दौंड-मनमाड मार्गे वळविणे व कोपरगांवला थांबा द्यावा. दुरांतो एक्सप्रेस-गरीब रथ एक्सप्रेस-हमसफर एक्सप्रेस-संपर्क क्रांती एक्सप्रेस-शिर्डी कालवा एक्सप्रेस यांना कोपरगांव येथे थांबा देणे व संवत्सर रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात आलेल्या कॉटर्सला ड्रेनेजची व्यवस्था करून मिळावी”-ना.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी कोपरगाव येथे आले काळे त्यांनी कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विविध समस्यांबरोबरच प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनच्या मागील चार वर्षापासून सुरु असलेल्या सर्व्हेकडे त्यांचे लक्ष वेधले. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे मार्गामुळे कोपरगाव-रोटेगाव या दुष्काळी भागातील दळणवळण वाढून या भागाचा विकास होण्यास मदत होणार आहे.सदरच्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनवर कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे.
या रेल्वे स्टेशनमुळे या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागाचा विकास साधला जाणार असल्यामुळे हा सर्वे तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करून इतरही रेल्वेबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात बंद करण्यात आलेले संवत्सर रेल्वे स्टेशन पूर्ववत सुरू करणे.आंचलगाव ते चितळी पर्यंतच्या रेल्वे बोगद्यात पावसाळ्यात व हिवाळ्यात पाणी साचून राहत असल्यामुळे वाहतुकी साठी अडचण होत असून त्याबाबत योग्य उपाययोजना कराव्या. कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॉटफॉर्म नंबर ३ ला लुक लाईन करणे व रुंदी वाढवावी. कोपरगांव रेल्वे स्टेशनला मंजूर असलेल्या लिप्टचे काम तातडीने सुरु करावे. कोपरगांव स्टेशन जम्बो साईडिंगला लुक लाईनमध्ये वर्ग करावी जेणेकरून कांद्यासह जास्तीत जास्त शेतीमाल परराज्यात विक्रीसाठी पाठविणे शक्य होईल.

कोपरगांव रेल्वे स्टेशन येथे जम्बो गुड्स शेड मंजूर करावे.प्रस्तावित यशवंतपूर-निजामाद्दीन-राजधानी एक्सप्रेसला दौंड-मनमाड मार्गे वळविणे व कोपरगांवला थांबा द्यावा. दुरांतो एक्सप्रेस-गरीब रथ एक्सप्रेस-हमसफर एक्सप्रेस-संपर्क क्रांती एक्सप्रेस-शिर्डी कालवा एक्सप्रेस यांना कोपरगांव येथे थांबा देणे व संवत्सर रेल्वे स्टेशन येथे बांधण्यात आलेल्या कॉटर्सला ड्रेनेजची व्यवस्था करून मिळावी आदी मागण्यांचा दिलेल्या निवेदनात समावेश आहे.सदर मागण्यांचा विचार करून रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सर्व मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही रेल्वेचे जनरल मॅनेजर अनिलकुमार लाहोटी ना.काळे यांना दिली.यावेळी रेल्वेचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close