जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

वैद्यकीय शिक्षण शुल्कासाठी महिलेचा छळ,कोपरगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना येथील माहेर व सातपूर औद्योगीक वसाहत नाशिक येथील सासर असलेल्या महिलेचा सासरच्या मंडळींनी तिच्या नवऱ्याच्या वैद्यकीय शिक्षणासाठी माहेराहून ०२ लाख रुपये आणावे यासाठी नवरा राहुल शंकरराव जाधव,सासरे शंकरराव जाधव,सासू शोभा शंकरराव जाधव,दिर ऋषिकेश शंकरराव जाधव,अक्षय शंकरराव जाधव जाव रुही अक्षय जाधव आदींनी छळ केला असल्याचा गुन्हा फिर्यादी महिला नीलिमा राहुल जाधव हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सासरच्या मंडलीसोबत आम्ही लासलगाव टाकली कधी सातपूर नाहसिक येथे रहात होतो.दरम्यान आपल्याला सासरच्या मंडळींनी,”तुला धुणे धुता येत नाही”,”तुला स्वैंपाक येत नाही”सासरे शंकरराव जाधव व जाव रुही जाधव हि नवऱ्याचे कान भरवत असे.त्यावर नवरा मला मारहाण करत असे.सासरा व दीर हे दारू पिऊन आल्यावर माझ्या सोबत वाद घालत असत.व पतीला उलटपालट सांगत असे.अशा किरकोळ कारणावरून मारहाण करून उपाशी पोटी ठेऊन छळ सुरु केला होता.यातून हा गुन्हा दाखल झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला नीलिमा राहुलदेव जाधव हिचे माहेर हे कोपरगाव शहराच्या ईशान्येस साधारण तीन कि.मी.अंतरावर असलेल्या संजीवनी सहकारी साखर कारखान्यावरील असून तिचे लग्न सन-२०१३ साली २९ जुलै रोजी नाशिक येथील तरुण राहुल जाधव यांचेशी मोठया थाटामाटात करून दिले होते.लग्नाचे वेळी तिच्या वडिलांनी अडीच तोळे सोने स्रिधन म्हणून दिले होते.सुरुवातीस आम्ही सर्व एकत्र रहात होतो.सुरुवातीचे सहा महिन्याचा अपवाद वगळता नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर साधारण सहा महिन्यांनी फिर्यादी महिलेला तिच्या सासरच्या मंडळींनी तुझ्या माहेरच्या लोकांनी लग्नात आमचा मानपान ठेवला नाही असा आरोप सुरु केला.आम्ही लासलगाव टाकली कधी सातपूर नाहसिक येथे रहात होतो.दरम्यान आपल्याला सासरच्या मंडळींनी,”तुला धुणे धुता येत नाही”,”तुला स्वैंपाक येत नाही”सासरे शंकरराव जाधव व जाव रुही जाधव हि नवऱ्याचे कान भरवत असे.त्यावर नवरा मला मारहाण करत असे.सासरा व दीर हे दारू पिऊन आल्यावर माझ्या सोबत वाद घालत असत.व पतीला उलटपालट सांगत असे.अशा किरकोळ कारणावरून मारहाण करून उपाशी पोटी ठेऊन छळ सुरु केला होता.रात्री अपरात्री घराच्या बाहेर काढून देणे असा त्रास सुरु केला होता.सदर महिलेने या बाबत आपल्या माहेरी असलेल्या मंडळींना या बाबत वेळोवेळी कल्पना दिली होती.सुरुवातीला मला नांदावयाचे असल्याने आपण हा त्रास सहन केला होता.अगोदर वेळोवेळी विविध रकमा माझे वडिलांकडून आणावयास लावल्या होत्या.त्या नंतर मात्र नंतर वैद्यकीय शिक्षणासाठो दोन लाखांची मागणी केली होती.हा त्रास सहन न झाल्याने आपण हा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी सदर महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४८ भा.द.वि.कलम ४९८ (अ) ४०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close