जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पाण्यात पडून पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू,कोपरगावात अकस्मात मृत्यू

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात अंचलगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले जोडपे निलेश रावसाहेब शिंदे (वय-२६) व त्यांची पत्नी पूजा निलेश शिंदे (वय-२३) हे दोघे दि.०८ फेब्रुवारी रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास गट क्रं.१६९ मधील शेततळ्यात आपल्या पशुधनास पाणी आणण्यासाठी गेले असता त्यांचा पाय घसरून ते पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची खबर नितीन अंबादास शिंदे (वय-३४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले असता पतीचा पाय घसरून ते पडले असता त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नीने प्रयत्न केला असता त्यात सदर पत्नीही पाण्यात पडली तळ्याचा काठ निमुळता असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.या प्रकरणी त्यांचा आवाज ऐकून मयत तरुणांच्या आईने आरडाओरडा केला मात्र जवळपास मदतीला कोणी नसल्याने मात्र कोण आधी गेले व त्या घटनेत कोणाचा पाय घसरला हे समजू शकले नाही.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,खबर देणार नितीन शिंदे हे अंचलगाव शिवारातील रहिवासी असून त्यांचे अंचलगाव शिवारात शेतजमीन असून त्यात शिवारात त्यांचे शेततळे आहे.त्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास मयत निलेश रावसाहेब शिंदे (वय-२६) व त्यांची पत्नी पूजा निलेश शिंदे (वय-२३) हे दोघे आपल्या जनावरांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेले असता पतीचा पाय घसरून ते पडले असता त्यांना वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नीने प्रयत्न केला असता त्यात सदर पत्नीही पाण्यात पडली तळ्याचा काठ निमुळता असल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.या प्रकरणी त्यांचा आवाज ऐकून मयत तरुणांच्या आईने आरडाओरडा केला मात्र जवळपास मदतीला कोणी नसल्याने मात्र कोण आधी गेले व त्या घटनेत कोणाचा पाय घसरला हे समजू शकले नाही.तथापि या प्रकरणी नजीकचे ग्रामस्थ मदतीला आले तो पर्यंत उशीर झाला होता.त्या जोडीस वर काढले व उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालायत भरीत केले असता वैद्यकीय उपचार करण्याऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.त्या जोडप्यावर आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

घटनास्थळी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,उपनिरीक्षक भरत नागरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close