जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

ग्रामसभेत हाणामारी,कोपरगावात पाच जणांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित केलेल्या ग्रामसभेत सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास दोन गटात हाणामारी होऊन त्यात एक जण गंभीर जखमी झाला असून या प्रकरणी फिर्यादी काशिनाथ रंगनाथ वक्ते (वय-५७) यांनी त्याच गावातील आरोपी यशवंत विठ्ल आव्हाड,रामा सुभाष आव्हाड,विलास रंगनाथ आव्हाड,विठ्ठल रंगनाथ आव्हाड आदी विरुद्ध अदखल पात्र गुन्हा दाखल केला असून त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी हे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आल्यावर गुरुद्वारा रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच दुसरा राडा झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यात फिर्यादीला मारहाण करताना अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असून आरोपींना बदडले असल्याचे वृत्त आहे.दरम्यान या प्रकरणी ईशान्य गडावरील युवराजाने या प्रकरणी समेट घडवून आणण्यासाठी मोठा प्रयास केल्याचे वृत्त आहे.मात्र तब्बल तेरा दिवस उलटूनही त्यात त्यांना अपयश आले आहे.फिर्यादी आणि आरोपी हे दोन्ही गट कोल्हे गटाचे असल्याची माहिती आहे.

ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेसाठी ग्रामसभेच्या सदस्यांनी एकत्र यावे.लोकांच्या गरजा काय आहेत त्या ग्रामपंचायतीला सांगाव्यात आणि गावांच्या भल्यासाठी कोणत्या योजना अगोदर घ्याव्यात हे सुचवावे.ग्रामपंचायतीला सल्ला दयावा आणि मार्गदर्शन करावे.थोडक्यात सांगावयाचे तर ग्रामसभेच्या सदस्यांनी गावांच्या विकासात सहभागी व्हावे.या शिवाय ग्रामसभेने,ग्रामपंचायतीने वर्षभरात गावांच्या विकासाची जी कामे केली असतील त्यांची माहिती व आढावा घ्यावा.ग्रामपंचायतीने पुढील वर्षी विकासाची जी कामे करावयची ठरविले असेल त्यांची माहिती घ्यावी.ग्रामपंचायतीने वर्षभर केलेल्या खर्चाचा हिशोब घ्यावा आणि पुढील वर्षी किती खर्च केला जाणार आहे त्याची माहिती घ्यावी.ग्रामपंचायतीने हिशोब तपासताना हिशोब तपासणाऱ्या अधिकाऱ्याला ज्या शंका आल्या असतील त्या शंका जाणून घ्याव्यात आणि त्या शंकांना ग्रामपंचायतीने जी उत्तरे दिली असतील ती उत्तरे समजून घ्यावीत.ग्रामपंचायत करीत असलेल्या कारभाराची प्रश्न विचारून माहिती घ्यावी आणि ग्रामपंचायतीला सूचना कराव्यात.म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कारभारावर ग्रामसभेने नियंत्रण ठेवावे आणि ग्रामपंचायतीवर निवडून दिलेल्या सदस्यांनी चांगली कामे केली तर प्रोत्साहन दयावे व त्यांच्याकडून कामे नीट होत नसतील तर त्यांना जाब विचारावा अशी अपेक्षा आहे.मात्र कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील ग्रामसभा मात्र वेगळ्याच कारणाने गाजली असून त्यात विषयांतर होऊन थेट एकमेकावर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली असून या प्रकरणी नुकताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी काशिनाथ वक्ते हे जेउर कुंभारी येथील रहिवासी असून चार आरोपी यशवंत विठ्ल आव्हाड,रामा सुभाष आव्हाड,विलास रंगनाथ आव्हाड,विठ्ठल रंगनाथ आव्हाड हे त्याच गावातील रहिवासी आहेत.त्यांच्यात सरकारी जमिनीच्या अवैध वापरावरून वाद असल्याचे समजते.त्यावरून दोन गट आमने-सामने आले होते.त्या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले असल्याचे फिर्यादी काशिनाथ वक्ते यांनी फिर्यादीत म्हटलं आहे.

दरम्यान आरोपी काशिनाथ वक्ते हे कोपरगाव शहर पोलीस ठण्यात या वादावादीची तक्रार देण्यासाठी जात असताना मोहिनीराज नगर येथे आरोपीनी फिर्यादी यांना गाठवले व त्यास म्हणाले की,”तु तक्रार देण्यासाठी जाऊ नको”असे म्हणाले असता फिर्यादी यांनी आरोपीस म्हणाले की,”मी तक्रार देण्यासाठी जाणार आहे”असे म्हणाल्याचा आरोपीना राग आला व त्यांनी आपल्याला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.फिर्यादी यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या प्रकरणी पोलिस निरीक्षक यांचेशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान हे प्रकरण येथे मिटले नाही त्यांनी फिर्यादी हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आल्यावर गुरुद्वारा रस्त्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच दुसरा राडा झाल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यात फिर्यादीला मारहाण करताना अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असून आरोपींना बदडले असल्याचे वृत्त आहे.दरम्यान या प्रकरणी ईशान्य गडावरील युवराजाने या प्रकरणी समेट घडवून आणण्यासाठी मोठा प्रयास केल्याचे वृत्त आहे.मात्र तब्बल बारा दिवस उलटूनही त्यात त्यांना अपयश आले आहे.फिर्यादी आणि आरोपी हे दोन्ही गट कोल्हे गटाचे असल्याची माहिती आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अदखल पात्र गुन्हा क्रं.कलम १५५ प्रमाणे भा.द.वि.कलम ३२३,५०४,५०६ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ढाकणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close