जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कारची ट्रकला धडक,एक ठार,एक जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावरील पुणतांबा फाट्यानाजीक असललेल्या कातकडे पेट्रोलपंपा समोर ट्रकचा (क्रं.एम.१८ बी.जी.५४४३) टायर फुटल्याने तो ती बाजूला घेऊन बसवत असताना संवत्सर कडून वेगाने येणारी झायलो कारने (क्रं.एम.एच.०४,डी.वाय.९६११) आज दुपारी ०२.०९ वाजेच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकला जोराची धडक दिल्याने त्यातील चालक हा सलीम चांद शेख हा स्वतः जखमी झाला व बाबासाहेब कचरू वाहुले (वय-३७) याचे मृत्यूस कारणीभूत झाल्याची फिर्याद ट्रक गाडीमालक आनंद राजेश त्रिभुवन (वय-३२) यांनी कोपरगाव शहरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

छायाचित्र

नक्षत्रवाडी औरंगाबाद येथील ट्रक मालक आनंद त्रिभुवन यांच्या मालकीचा ट्रक असून तो औरंगाबाद कडे जात होता.मात्र त्यांचा टायर फुठल्याने तो टायर ते बदलविण्यासाठी थांबले असता समोरून वरील क्रमांकाची झायलो कार भरधाव वेगाने आली व त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून समोर उभ्या असलेल्या ट्रकवर डाव्या बाजूने जोराने धडकवली आहे.त्यात कार चालक स्वतः जखमी झाला असून त्या कारमधील मुंबई येथील अन्य इसम बाबासाहेब कचरू वाहिले यांचे निधन झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी नक्षत्रवाडी औरंगाबाद येथील ट्रक मालक आनंद त्रिभुवन यांच्या मालकीचा ट्रक असून तो औरंगाबाद कडे जात होता.मात्र त्यांचा टायर फुठल्याने तो टायर ते बदलविण्यासाठी थांबले असता समोरून वरील क्रमांकाची झायलो कार भरधाव वेगाने आली व त्याने रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून समोर उभ्या असलेल्या ट्रकवर डाव्या बाजूने जोराने धडकवली आहे.त्यात कार चालक स्वतः जखमी झाला असून त्या कारमधील नालंदानगर,घटकोपर ईस्ट,मुंबई येथील अन्य इसम बाबासाहेब कचरू वाहिले यांचे निधन झाले आहे.दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपली कार भरधाव वेगाने चालविणारा चालक सलीम चांद शेख रा.नालंदानगर घाटकोपर,ईस्ट मुंबई याचे विरुद्ध गुन्हा क्रं.३६/२०२२ भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम१८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close