गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात तुंबळ हाणामारी,आठ जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या श्रावण विठ्ठल मलिक (वय-३७) यांनी आपल्याला आरोपी वसंत त्र्यंबक भगुरे व अन्य सात जणांनी तुम्ही “जमिनीच्या वादात न्यायालयातील दाव्यात तुम्ही बाजू मांडू नका, न्यायालयात हजर राहू नका” असे म्हणून आपल्याला दमदाटी करून ओट्याच्या खाली ओढून गज काठ्यांनी आपल्याला व साक्षीदारांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
कासली येथे फिर्यादी व आरोपी यांच्यात जमिनीच्या कारणावरून कोपरगाव येथील न्यायालयात वाद सुरु आहे.न्यायायातील वाद न्यायालयातून सोडविण्याऐवजी दि.०७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास फिर्यादी याच्या ओट्यावर जाऊन आरोपी वसंत भगुरे,नानासाहेब काशिनाथ मलिक,दिनेश नानासाहेब मलिक,पवन नानासाहेब मलिक,त्र्यंबक भगुरे यांनी फिर्यादीच्या ओट्यावर गैर कायद्याची मंडळी जमवून व जाऊन श्रावण मलिक यास,”न्यायालयात तुम्ही न्यायालयात तुमची बाजू मांडू नका,व न्यायालयात हजर राहू नका”असे म्हणून फिर्यादी श्रावण मलिक यास दमदाटी केली मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी श्रावण मलिक व आरोपी वसंत भगुरे हे कासली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी आहे.त्यांच्यात जमिनीच्या कारणावरून कोपरगाव येथील न्यायालयात वाद सुरु आहे.न्यायायातील वाद न्यायालयातून सोडविण्याऐवजी दि.०७ फेब्रुवारी रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास फिर्यादी याच्या ओट्यावर जाऊन आरोपी वसंत भगुरे,नानासाहेब काशिनाथ मलिक,दिनेश नानासाहेब मलिक,पवन नानासाहेब मलिक,त्र्यंबक भगुरे यांनी फिर्यादीच्या ओट्यावर गैर कायद्याची मंडळी जमवून व जाऊन श्रावण मलिक यास,”न्यायालयात जमिनीचा वाद सुरु असून त्यात तुम्ही न्यायालयात तुमची बाजू मांडू नका,व न्यायालयात हजर राहू नका”असे म्हणून फिर्यादी श्रावण मलिक यास दमदाटी केली.व फिर्यादी यास खाली ओढून आरोपीनी अन्य आरोपीना फोन करून हिरामण रमेश मलिक लक्ष्मण बाळा मलिक दोघे रा.कासली व पढेगाव येथील वाल्मिक शिंदे,आदींना बोलावून फिर्यादी व साक्षिदार याना मारहाण केली.दरम्यान हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची आई मध्ये आली असता तिला ढकलून दिले आहे.असा आरोप करून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलीसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३९/२०२२ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदार्षणाखाली पो.हे.कॉ.एन.एस.शेख हे करीत आहेत.