जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात दोन गटात झुंज,पोलिसांचा लाठी प्रसाद वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील गांधीनगर या उपनगरात काल रात्री ०९ वाजेच्या सुमारास दोन गटात अंबिका मेडिकल समोर सार्वजनिक ठिकाणी दोन गटात झुंज झाली असून या प्रकरणी कोपरागाव शहर पोलिसांनी आरोपी साहिरूप अंबादास पवार,गणेश प्रकाश खिलारी,शफीक दस्तगिर शेख,अरफाक रफिक शेख आदीं विरुद्ध फिर्यादी पोलीस नाईक अर्जुन मच्छीन्द्र दारकुंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी गांधीनगर अंबिका मेडिकल समोर दंगा करणाऱ्या दोन गटांना आपला पोलिसी हिसका दाखवून दोन्ही गटास नियंत्रणात आणले आहे.व त्या गुन्हयातील आरोपी साहिरूप अंबादास पवार,गणेश प्रकाश खिलारी,शफीक दस्तगिर शेख,अरफाक रफिक शेख आदीं विरुद्ध फिर्यादी पोलीस नाईक अर्जुन मच्छीन्द्र दारकुंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहरातील गांधीनगर हे उपनगर अत्यंत संवेदनशील मानले जाते.या ठिकाणी वेळोवेळी क्षुल्लक कारणावरून दोन गट आमनेसामने येतात हि बाब नित्याचीच झाली असून कोपरगाव शहर पोलीसांना या परिसरातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी वारंवार धाव घ्यावी लागते.अशीच घटना दि.०२ फेब्रुवारी रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत कळाली होती.पोलीस निरिक्षक देसले यांनी तात्काळ आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी रवाना केले असता त्या ठिकाणी दोन गट आपसाआपसात झुंज करताना मिळून आले आहे.पोलिसानी या घटनेची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेऊन तेथील जमावास आपल्या लाठीचा दणका दाखवून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी आपला पोलिसी हिसका दाखवून दोन्ही गटास नियंत्रणात आणले आहे.व त्या गुन्हयातील आरोपी साहिरूप अंबादास पवार,गणेश प्रकाश खिलारी,शफीक दस्तगिर शेख,अरफाक रफिक शेख आदीं विरुद्ध फिर्यादी पोलीस नाईक अर्जुन मच्छीन्द्र दारकुंडे यांनी गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान हे उपनगर सामाजिक शांतता भंग करण्यात नेहमीच पुढे असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.वर्तमानात पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे दिसते आहे.त्यामुळे पोलिसांना जाणीवपूर्वक आपली वक्रदृष्टी ठेवणे भाग असल्याचे म्हटले जात आहे.

या प्रकरणी पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.२७/२०२२ भा.द.वि.कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपासपोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close