शैक्षणिक
कोपरगावातील…या महाविद्यालयाचा दोन भिन्न संस्कृतींना एकत्र आणण्याचा स्तुत्य उपक्रम-कौतुक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
इंटरकल्चरल कम्युनिकेशन व्हाया इंटरनॅशनल कोलॅबोरेशन प्रोजेक्ट हा प्रकल्प म्हणजे केवळ दोन उच्च शिक्षण संस्था अथवा विद्यापीठांतील शैक्षणिक संबंध सुरू ठेवण्यापुरता मर्यादित नसून भिन्न संस्कृतींना एकत्र आणण्यासाठीचा ठोस संबंध असल्याचे प्रतिपादन मलेशियातील मारा युनिव्हर्सिटीच्या केदाह केंद्राचे प्रोफेसर डॉ.हेमधी यांनी कोपरगाव येथील ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“संस्कृती ही मानवी जीवनाचा अनिवार्य भाग आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन देशांच्या संस्कृतींचे आदान-प्रदान झाले आणि या माध्यमातून संपूर्ण जग हे जणू काही एक गाव आहे हे सिद्ध झाले”-संदिप रोहमारे,विश्वस्त,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी.
मलेशिया स्थित मारा विद्यापीठाच्या केदाह ब्रांच आणि भारतातील के.जे.सोमैया महाविद्यालय कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१० नोव्हेंबर २०२१ ते २५ जानेवारी २०२२ रोजी “विंडो टू द बॉर्डरलेस वर्ल्ड इंटरकल्चरल कम्युनिकेशन इंटरनॅशनल कोलॅबोरेशन” या प्रकल्पाच्या समारोप समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.या ऑनलाईन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे हे होते.पुढे बोलताना ते म्हणाले की,”या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन्ही देशातील संस्कृती व परंपरा विद्यार्थ्यांना समजली असून त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.जगात सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक तसेच सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करायचे असतील तर विविध देशांच्या संस्कृतींची ओळख करून घेणे आवश्यक आहे.विविध प्रकारच्या संस्कृतींची ओळख म्हणजेच खऱ्या अर्थाने माणसा- माणसाची ओळख होय आणि त्यामाध्यमातून जवळ येणे होय. अशा कार्यक्रमांचे पुन्हा पुन्हा होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी शेवटी केले आहेसदर प्रसंगी मलेशियातील मारा युनिव्हर्सिटीच्या केदाह केंद्राचे प्रोफेसर डॉ.हेमधी यांनी,”या दोन्ही संस्थांनी भविष्यात देखील एकत्र येऊन असे उपक्रम सुरू ठेवावेत” असे आवाहन केले आहे.कार्यक्रमाचे प्रास्तविक मारा विद्यापीठाच्या प्रा.सियाजलियाती इब्राहिम यांनी केले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी एस यादव,आय.क्यू.ए.सी.समन्वयक प्रा.विजय ठाणगे,कार्यक्रमाचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ.रवींद्र जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
या कार्यक्रमात मलेशियातील १६३ व सोमैया महाविद्यालयाच्या २०० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन २० ऑनलाइन सत्रांमध्ये व फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधला आहे.या कार्यक्रमात पर्यटन सण-उत्सव,चित्रपट,श्रद्धा आणि त्यामागील विज्ञान,नृत्य,संगीत,ड्रेसिंग पॅटर्न,विवाह शैली,भाषा व धर्म रचना,खाद्यसंस्कृती आदी अनेक विषयांचा समावेश होता.या समारंभातमध्ये दोन्ही देशातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर तसेच सांस्कृतिक नृत्य व गीते ऑनलाइन स्वरूपात सादर केलीत.तसेच कार्यक्रमाची सुरुवात भारत आणि मलेशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने झाली.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मारा विद्यापीठाच्या शरीना साद मॅडम,प्रा.अझलान,रफीदाह मॅडम,बवानी मॅडम,नूर हिदियाती,नॉरलिझाती,ऐशा मॅडम,रूबेखा मॅडम,नूर असनी,साकिराह मॅडम,समसिहा मॅडम,नोर असला,प्रा.अझरूल व सोमैया महाविद्यालयाचे डॉ.संजय अरगडे,प्रा.बाळनाथ मोरे,प्रा.कोमल म्हस्के,प्रा.विजय खंडीझोड,डॉ.महारुद्र खोसे,प्रा.आकाश पवार,प्रा.निखील लोंढे,प्रा.वर्षा आहेर,प्रा.प्रशांत भदाणे आदींनी परिश्रम घेतले आहे.