जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मुलीस फूस लावून पळवले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेढे ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी (वय-१७) हिला अज्ञात इसमाने आज पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्यादी मुलीची आई (वय-४२) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने हिंगणीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.अशा घटनात कोपरगाव तालुक्यात विलक्षण वाढ झाली आहे.हा सामाजिक प्रश्न उग्र स्वरूप घेऊ लागला आहे.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिस देखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील हिंगणवेढे ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे हिंगणी व परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीची आई हि हिंगणवेढे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे.तेथे ते आपल्या पत्नी,आई,वडील,व आपल्या सतरा वर्षीय मुलीसह आपल्या छोट्या घरात राहतात.बुधवार दि.१९ जानेवारी रोजी पहाटे ०२.४१ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपीने आपली मुलगी काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात कारणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून मुलीच्या आईने अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close