गुन्हे विषयक
कोपरगावातील…त्या खुनातील आरोपी जेरबंद,
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात भर आठवडे बाजाराच्या दिवशी शिंगणापूर येथील तरुण राजेंद्र बबनराव भोसले याची दुचाकीला कट मारण्याचा कारणावरून हत्या केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी सर्व चारही आरोपी जेरबंद केले असून त्यात राहुल रवींद्र उर्फ संजय माळी.रा.मोहिनीराजनगर, राहुल गणेश मगर रा.गोरोबानगर,गफूर अब्दुलगणी बागवान,विराज कैलास कानडे दोन्ही रा.लिंबारा मैदान,आदींना पोलिसांनी ताब्यात घेऊन जेरबंद केले असून त्यांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना प्रथम वर्ग न्यायालयाचे न्या. डोईफोडे यांनी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान यातील प्रमुख आरोपी राहुल मगर यास शहर पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले होते.तर अन्य राहुल माळी व गफूर बागवान या दोन आरोपींना स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूच्या काटवनातून अटक केली होती.तरच चौथा आरोपी कैलास कानडे याची गुप्त बातमीनुसार येवला जिल्हा नाशिक येथील टोल नाक्याजवळ असलेल्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यास अटक केली होती.पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मयताचा भाऊ रवींद्र बबनराव भोसले (वय-३१) रा.गोपाळवाडा,संजीवनी कारखाना शिंगणापूर याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यात त्याने म्हटले आहे की,”सोमवार दि.०३ जानेवारी रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास फिर्यादीचा भाऊ व आरोपी यांच्यात वाद होऊन यातील आरोपी क्रं.एक राहुल माळी याने मयत तरुण राजेंद्र भोसले यास डोक्यात दगड मारला त्याचा गंभीर घाव लागल्याने तो त्या वाराने खाली पडला असता अन्य आरोपी राहुल मगर,कैलास कानडे यांनी त्यास खाली पडल्यावर त्यास लाथांनी मारहाण केली होती.तर गफूर बागवान याने त्यास तेथील दुकानाच्या तंबूला दोर बांधण्यास वापरण्यात येणाऱ्या मोठ्या लांबीच्या लोखंडी खुंटीने तीन-चार वेळेला जोराचा घाव घालून त्यास गंभीर जखमी केले त्या घावाने तरुण राजेंद्र भोसले हा जागीच गतप्राण झाला होता.घटनेनंतर आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाले होते.
या घटनेची कोपरगाव शहर पोलिसांनी गंभीर दखल घेऊन आपल्या दप्तरी गुन्हा दाखल करून शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पथके स्थापन करून त्या आरोपींच्या शोधार्थ विविध दिशांना पाठविण्यात आले होते.
दरम्यान यातील प्रमुख आरोपी राहुल मगर यास शहर पोलिसांनी चोवीस तासात जेरबंद केले होते.तर अन्य राहुल माळी व गफूर बागवान या दोन आरोपींना स्वामी समर्थ केंद्राच्या मागील बाजूच्या काटवनातून अटक केली होती.तरच चौथा आरोपी कैलास कानडे याची गुप्त बातमीनुसार येवला जिल्हा नाशिक येथील टोल नाक्याजवळ असलेल्या शेतात लपून बसल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यास अटक केली होती.त्यांना कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कामी वरिष्ठ अधिकऱ्यांचं मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देसले,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,रोहिदास ठोंबरे,सहाय्यक फौजदार संजय पवार,पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे,कोरेकर,शेवाळे,पो.कॉ.संभाजी शिंदे,खारतोडे,गणेश काकडे,धोंगडे,थोरात,दीपक ढाकरे,गणेश मैड, मासळ,महिला पोलीस कॉन्टेबल बनकर त्रिभुवन,विजया दिवे आदींनी मोलाची कामगिरी बजावली आहे.तर पुढील तपास उप पोलिस निरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.