जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात भर बाजारात तरुणांची हत्या,अद्याप गुन्हा नाही.

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी राजेंद्र भोसले कराटे प्रशिक्षक तरुणांचा आज भर बाजारात चार तरुणांच्या टोळक्याने दगड व लोखंडी रॉडच्या सहाय्याने हत्या केली आहे.त्यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.आरोपी घटना स्थळावरून फरार असून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची पक्की खबर आहे.

दरम्यान त्याचा आपला पारंपरिक म्हशी पालनाचा व्यवसाय सांभाळून तो त्या बरोबरच तो कराटे प्रशिक्षक होता.त्या सोबतच त्याचा खाजगी सावकारीचा व्यवसाय असल्याची गोपनीय माहिती हाती आली असून यातूनच काही तरी भांडण होऊन त्याचा प्रतिस्पर्ध्यानी काटा काढला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या गुन्ह्यातच एकूण चार आरोपी असल्याची माहिती मिळाली असून त्यातील तीन नावे पोलिसांना समजली आहे,मात्र अद्याप चौथा आरोपी कोण हे समजले नसल्याची माहिती आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेला तरुण राजेंद्र भोसले हा आपल्या आई,वडील,भाऊ आदी कुटूंबासमवेत रहात होता.त्यांचा पारंपरिक पशुपालनाचा व्यवसाय असून तो या खेरीज कराटे प्रशिक्षक होता.तो त्या बाबत काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होता.आज दुपारी तो काही कामानिमित्त कोपरगाव शहरात आला होता.आज कोपरगाव येथील आठवडे बाजार असल्याने काही खरेदी करण्यासाठी बाजारात मुंबादेवी मंदिर परिसरात असताना.त्याच्यावर चार तरुणांनी लोखंडी रॉड व दगडाच्या सहाय्याने अचानक हल्ला चढवला होता.त्यातच तो गंभीर जखमी झाला होता.या घटनेने कोपरगाव बाजार तळावर हाहाकार उडाला होता.

दरम्यान हि बाब कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांना समजली त्यांनी घटनस्थळी आपल्या सहकाऱ्यांसमवेत धाव घेतली असता मयत तरुण हा त्यांना जखमी अवस्थेत आढळला होता.त्यास उपचारार्थ कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी रुग्णालयात हलवले होते.मात्र तेथील उपचार करण्याऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधिकारी दीपाली काळे व शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली असून तातडीची बैठक घेऊन आरोपींच्या शोधात पोलिसांना रवाना केले आहे.

दरम्यान या घटनेतील मयत तरुण हा मितभाषी व शांत स्वभावाचा होता.त्याचे गावात कोणाशी वैर नव्हते मात्र त्याची पार्श्वभूमी हि गुन्हेगारीची असल्याची अशी माहिती तेथिल ग्रामस्थांनी सांगितली आहे.दरम्यान त्याचा आपला पारंपरिक म्हशी पालनाचा व्यवसाय सांभाळून तो त्या बरोबरच तो कराटे प्रशिक्षक होता.त्या सोबतच त्याचा खाजगी सावकारीचा व्यवसाय असल्याची गोपनीय माहिती हाती आली असून यातूनच काही तरी भांडण होऊन त्याचा प्रतिस्पर्ध्यानी काटा काढला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेने कोपरगाव शहर हादरले असून तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.या बाबत पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सदर बातमी अद्यावत होत आहे……..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close