जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव…या साठवण तलावास प्रशासकीय मान्यता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या साठवण तलाव क्रमांक ५ साठी १२३ कोटी रुपये खर्चाला प्रकल्प मान्यता समितीच्या बैठकीत प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी अंमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

“पाच नंबर साठवण तलावाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळवून पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु होणार आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे या बाबत आग्रही असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव शहरातील जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी निवडून येताच दोनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील खोदाईचे काम सुरु केले होते. कोपरगाव शहरातील नागरिकांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी ५ नंबर साठवण तलाव महत्वपूर्ण ठरणार आहे.त्यामुळे पुढील कामासाठी तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १२३ कोटी रुपयांच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मिळाली होती. या मंजुरीला प्रशासकीय मंजुरी मिळवून निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ.काळे पाठपुरावा करत आहे.
त्या पाठपुराव्याची नगरविकास विभागाने दखल घेवून नुकतीच त्याबाबत नगर विकास विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रकल्प मान्यता समितीची बैठक आयोजित केली होती.या बैठकीत पाच नंबर साठवण तलावाच्या १२३ कोटी रुपये निधीला प्रकल्प मान्यता समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.

सदर प्रसंगी नगरपरिषद प्रशासन संचालयानाचे संचालक गावडे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नंदनवारे,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक,सहसचिव पांडुरंग जाधव,नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

ताजा कलम

दरम्यान या पाणी योजनेबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी आमच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला असून त्यांनी,” या योजनेबाबत आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेशी संपर्क साधला असून त्यांनी राज्य सरकारला हि पाणी योजना मंजूर करण्यासाठी आदेश दिले आहेत.त्या नूसार हि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पार पडत असल्याचे सांगितले आहे.मात्र आपल्याला नियोजित बैठकीस वेळेअभावी पोहचता आले नाही.तथापि या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आदेशामुळे मार्गी लागत असून त्या साठी आ.आशुतोष काळे हेही प्रयत्नशील असल्याचे आमच्या प्रतिनिधीस सांगितले आहे.आपण उशिराने प्रधान सचिव महेश पाठक यांचे कोपरगावच्या नागरिकांच्या वतीने पेढे देऊन आभार मानल्याने सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close