जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात साडे पाच लाखांचे चोरीचे दागिने परत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातून गत सप्टेंबर महिन्यात ०५ लाख ५० हजार किमतीचे १२ तोळे वजनाचे घर मालकांचा विश्वास संपादन करून पळवलेले दागिने कोपरगाव शहर पोलिसांनी नुकतेच जप्त केले असून ते मूळ मालक महेश नारायण कडलग (वय-२४) रा.गांधीनगर कोपरगाव यांना परत केले आहे.पोलिसानी तपास करून मुंबईतील आरोपी नवनीत मधुकर नाईक व त्याची पत्नी स्मिता नवनीत नाईक यांना जेरबंद केला आहे.

कोपरगाव पोलिसांनी गांधीनगर येथील दागिने चोरी प्रकरणी तपास केला असता या गुन्ह्यात भाडेकरू असल्याचा संशय बळावला होता.त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता तो खरा उतरला होता.व ते घटनास्थळावरुन फरार झाले होते.त्या बाबत पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असता तो अंदाज खरा निघाला असून आरोपी नवनीत नाईक व त्याची पत्नी स्मिता नाईक यांना मार्च महिन्यात जेरबंद करून त्यांना बेड्या ठोकल्या होत्या त्यावेळी त्यांनी सम्बधित मुद्देमाल काढून दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून ते पोलिसांना जुमेनासे झाले आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात दि.२२ संप्टेंबर २०१८ रोजी घडली होती.व याबाबत गांधीनगर येथील फिर्यादी महेश कडलग यांच्या घरात एक जोडपे आपल्या मुलीसह राहावयास आले होते.त्यांनी मूळ मालकाचा विश्वास संपादन करून घेतला होता.दरम्यान मालकाच्या बहिणीचे लग्न होते.त्यासाठी त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी सुमारे बारा तोळ्यांचे विविध दागिने कोपरगावातील सराफाकडून बनवून घेतले होते.व आपल्या घरातील कपाटात ठेवले होते.त्या वेळी त्यावर भाडेकरू व त्याची पत्नी यांनी पाळत ठेवली होती.घरी कोणी नाही हि संधी साधून बनावट कुलुपाची चावी बनवून घराचे दार उघडून त्यातील सुमारे साडे पाच लाखांचा अवैज लंपास केला होता.घर मालक घरी आल्यावर त्यांनी काही निमित्ताने कपाट उघडून पहिले असता त्यातील सुमारे बारा तोळे वजनाचे दागिने सुवर्णकाराकडून बनवून घेतले होते.त्यात १२.२४ ग्रॅम वजनाचे गंठण,१०.५४० ग्रॅम वजनाचे नेकलेस,६, ११.५०,२०.१९०,१६.३२०,४३,११.०२ ग्रॅम वजनाचे विविध लड,असा ११९.२२४ ग्रॅम वजनाचे ०५ लाख ५० हजारांचे दागिने लंपास केले होते.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती.त्यावेळी त्यांचे धाबे दणाणले होते.दरम्यानच्या काळात भाडेकरू फरार झाल्याने घर मालकाचा त्यांच्यावर संशय बळावला होता.व त्यांनी आपले भ्रमण ध्वनी बंद केलेले आढळले होते.फिर्यादी यांनी तात्काळ कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.१७८/२०२१ अन्वये भा.द.वि.कलम ४५७,३८०,३४ प्रमाणे आरोपी भाडेकरू नवनीत नाईक व त्याची पत्नी स्मिता नाईक यांच्या विरुद्ध संशयित गुन्हा दाखल केला होता.

या घटने बाबत कोपरगाव पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता या गुन्ह्यात भाडेकरू असल्याचा संशय बळावला होता.त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता तो खरा उतरला होता.व ते घटनास्थळावरुन फरार झाले होते.त्या बाबत पोलिसांनी आपला मोर्चा वळवला असता तो अंदाज खरा निघाला असून आरोपी नवनीत नाईक व त्याची पत्नी स्मिता नाईक यांना मार्च महिन्यात जेरबंद करून त्यांना बेड्या ठोकल्या होत्या.व कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले होते.व त्यांच्याकडून वरील ऐवज जप्त केला होता.तो मुद्देमाल पोलिसांनी न्यायिक प्रक्रियेतून ताब्यात घेतला असून मूळ मालक यांच्या ताब्यात दिला आहे.याबाबत फिर्यादी महेश कडलग यांनी समाधान व्यक्त केला आहे.कोपरगाव शहर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close