जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातून नऊ लाखांच्या ट्रकची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरानजीक सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ उभी करून ठेवलेला लाल रंगाचा नऊ लाख रुपये किमतीचा टाटा कंपणीचा ट्रक क्रं.एम.एच.०४ ई.वाय.७१११) व लावा कम्पणीचा भ्रमणध्वनी असा ऐवज शेटेफळ ता.बारामती जिल्हा पुणे येथील आरोपी छगन प्रल्हाद वाबळे व अन्य दोन अनोळखी चोरटे यांनी दि.१५ डिसेंबर रोजी पहाटे ०३ वाजेच्या सुमारास पळवून नेला असल्याचा गुन्हा चाळीसगाव चण्डिकावाडी पाटणादेवी येथील फिर्यादी विलास कैलास चव्हाण (वय-२३) यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे ऊस वहातुक ट्रक चालकांत खळबळ उडाली आहे.

कोल्हे सहकारी कारखान्यानजीक पेट्रोल पंपाशेजारी वरील क्रमांकाचा ट्रक उभा करून ठेवला असता.व ते चालक,व त्यावरील कामगार हे आपल्या अड्ड्यावर विश्रांतीसाठी गेले असता.विश्रांती झाल्यावर ते पुन्हा सकाळी आपल्या ट्रक जवळ आले असता त्या ठिकाणी आपला ट्रक त्यांना उभा असलेला दिसला नाही.त्यांनी शोधाशोध करूनही उपयोग झाला नाही.अखेर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशीयत तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमानात दिवाळी पूर्वी ऊसाचा हंगाम सुरु झाला आहे.त्यासाठी चाळीसगाव,कन्नड,मराठवाडा आदी भागातून मोठ्या संख्येने मजूर व वाहतूकदार कोपरगाव तालुक्यात ऊस तोडणी वहातुकीसाठी येत असतात.त्यांच्यासाठी कोपरगाव नजीक असललेल्या सहकार महर्षी कोल्हे कारखान्यावर राहण्याची सोय आहे.तथापि रात्री अवेळी ऊस वहातून साधने खाली झाल्यावर ते विश्रांतीसाठी पेट्रोलपंप अथवा कारखान्याजवळ असललेल्या अड्ड्यावर काही काळ थांबतात.व विश्रांती नंतर पहाटेच्या सुमारास निघून जातात.अशीच घटना कोल्हे सहकारी कारखान्यानजीक पेट्रोल पंपाशेजारी वरील क्रमांकाचा ट्रक उभा करून ठेवला असता.व ते चालक,व त्यावरील कामगार हे आपल्या अड्ड्यावर विश्रांतीसाठी गेले असता.विश्रांती झाल्यावर ते पुन्हा सकाळी आपल्या ट्रक जवळ आले असता त्या ठिकाणी आपला ट्रक त्यांना उभा असलेला दिसला नाही.त्यांनी शोधाशोध करूनही उपयोग झाला नाही.अखेर त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशीयत आरोपी छगन प्रल्हाद वाबळे याचेसह अन्य दोघां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिसना निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३६२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाते हे करीत आहेत.या घटनेनं ट्रक चालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close