जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात दोन विविध घटनात दोघांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात दोन विविध घटनात दोघांचे निधन झाले आहे.यात पहिल्या घटनेत कोपरगाव शहरातील सुभाषनगर या उपनगरातील तरुण सुनील यमाजी पगारे (वय-३०) यांचे त्यांच्या राहत्या घरी त्यांनी आपल्या घराच्या छताच्या लाकडी बल्लीला दोरीच्या साहाय्याने गळफास करून आत्महत्या केली असल्याने निधन नुकतेच झाले असल्याची खबर त्यांचे बंधू लक्ष्मण यमाजी पगारे (वय-४०) यांनी कोपरगाव शहरातील पोलीस ठण्यात खबर दिली आहे.तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील दहिगाव बोलका येथील सुनील जगन्नाथ थोरात (वय-३०) यांचे निधन झाल्याची खबर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय.पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळे (उदा.वैफल्य,छिन्नमनस्कता,अनैच्छिक ब्रम्हचर्य,मद्यपाश,नशेच्या पदार्थांचा अंमल इत्यादी) व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते.तणाव,दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे,वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंते यांचाही यात वाटा असू शकतो.

आत्महत्या म्हणजे सहेतुकपणे स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य होय.पुष्कळदा आत्यंतिक नैराश्यामुळे किंवा मनात उद्भवलेल्या मानसिक विकारांमुळे व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते.तणाव,दुर्दैवाने वाट्याला आलेली आर्थिक संकटे,वैयक्तिक नातेसंबंधांतील गुंते यांचाही यात वाटा असू शकतो.आत्महत्या करू पाहणार्‍या व्यक्ती गळफास लावून घेणे,नस कापणे,विषारी पदार्थ खाणे,उंचावरून उडी मारणे असे विभिन्न मार्ग चोखाळत असल्याचे आढळते.जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख माणसे आत्महत्या करतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीत आत्महत्या तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.

पहिल्या कोपरगाव सुभाषनगर येथील घटनेत मयताने दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ०८ वाजे पूर्वी कधीतरी आपल्या जीवनाला कंटाळून आपल्याच घरातील छताला दोरी बांधून हि आत्महत्या केली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.क्रं.सी.आर.पी.सी.६९/२०२१ प्रमाणे नोंद केली आहे.मयताच्या भावाने या बाबत या घटनेची कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेतील मयतास कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंद दप्तर क्रं.७०/२०२१ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेटी दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close