गुन्हे विषयक
सव्वा लाखांची लूट करून चोरट्यांचे लक्ष्मीपूजन,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
येवला येथील कापड व्यापारी त्यांचे उधारीचे पैसे गोळा करून कोपरगाव येथून घरी येवला येथे जात असताना नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील तलावाजवळ लाल रंगाच्या दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी येऊन त्यांच्या दुचाकीला लाथ मारली यातील फिर्यादी काटेरी झुडपात जाऊन पडल्यानंतर त्याला मारहाण करण्याची धमकी देऊन त्यापैकी एकाने फिर्यादीकडील रोख रक्कम १ लाख २५ हजार रुपये काढून पोबारा करून ऐन दिवाळीचे दिवशी स्वतःचे लक्ष्मीपूजन केले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात येवला येथील फिर्यादी समशेर अन्सारी (वय-४२) यांनी गुन्हा दाखल केला आहे.
सांप्रत काळी कोपरगाव तालुक्यात चोऱ्या आणि तत्सम गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आपेगाव येथील दुहेरी खून,संवत्सर येथील दरोडा,आदी गुन्हे त्याचे त्याची उदाहरणे आहे.त्यातील संवत्सर येथील काही आरोपी अद्याप फरार असून त्यानंतर येसगाव शिवारात पुन्हा रस्ता लुटमारीची घटना उघड झाली आहे.त्यामुळे ग्रामस्थांत आणि व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,सांप्रत काळी कोपरगाव तालुक्यात चोऱ्या आणि तत्सम गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.आपेगाव येथील दुहेरी खून,संवत्सर येथील दरोडा,आदी गुन्हे त्याचे त्याची उदाहरणे आहे.त्यातील संवत्सर येथील काही आरोपी अद्याप फरार असून त्यानंतर पुन्हा रस्ता लुटमारीची घटना उघड झाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील कोपरगाव नगरपरिषद साठवण तलावानजीक फिर्यादी समशेर अहमद मोहमंद रमजान अन्सारी हे येवला येतील रहिवासी असून ठोक कापडाचे व्यापारी आहे.त्यांनी आपल्या मालाची वसुली करून ते आपल्या घरी जात असताना दि.२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास त्यांना लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्यांनीं त्यांना लाथ मारून एका झुडुपात पाडले व त्यांना मारण्याची धमकी देऊन त्यांच्या कडील ५००,२००,१०० दराच्या नोटा असलेली रोख रक्कम रुपये १ लाख २५ हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे.त्या नंतर चोरटे फरार झाल्यावर फिर्यादी यांनी सदर घटना स्थळावरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली व त्या ठिकाणी रात्री अकरा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.तालुका पोलिसांपुढे या चोरट्यांचे तपासाचे आव्हान उभे ठाकले आहे.
सदर घटनास्थळी शिर्डीचे प्रभारी असलेले श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके व कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दौलतराव जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.क्रं.४०७/२०२२ भा.द.संहिता कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.