कामगार जगत
कोपरगाव साखर कामगार सभेने केला..या नेत्याचा सत्कार
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारी कारखानदारीत अग्रणी असललेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने आपल्या कामगारांना राज्यात सर्वात प्रथम बारा टक्के पगार वाढ देऊन पहिला क्रमांक पटकावला असल्याने कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे यांचा सत्कार केला आहे.
शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत दि.९ सप्टेंबर रोजी साखर कामगारांना १२ टक्के वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या निर्णयाची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली.त्यानुसार कामगारांना १२ टक्के वेतनवाढ आहे.त्या बद्दल हा सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने साखर कामगारांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी नियुक्त केलेल्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत दि.९ सप्टेंबर रोजी साखर कामगारांना १२ टक्के वेतन वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या निर्णयाची कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी तात्काळ अंमलबजावणी केली.त्यानुसार कामगारांना १२ टक्के वेतनवाढ माहे ऑक्टोबर २०२१ पासून लागू करून प्रत्यक्षात कामगारांच्या बँक खात्यात देखील जमा केली आहे.त्यामुळे कामगारांना १२ टक्के वेतनवाढ प्रत्यक्षात देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना राज्यात पहिला ठरला आहे.याबाबत कोपरगाव तालुका साखर कामगार सभेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याचे मार्गदर्शक व जेष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.
यावेळी जनरल सेक्रेटरी नितीन गुरसळ,कामगार प्रतिनिधी अरुण पानगव्हाणे,सचिव प्रकाश आवारे,खजिनदार संजय वारुळे व कायदेशीर सल्लागार वीरेंद्र जाधव उपस्थित होते.
कामगार वेतन वाढीबाबत आ.काळे आग्रही होते.त्रिपक्षीय समिती कराराची मुदत संपून बरेच दिवस झाले असतांना त्यावर तातडीने निर्णय घ्यावा अशी त्यांची मागणी होती. त्यामुळे त्रिपक्षीय समितीचा १२ टक्के वेतनवाढीचा निर्णय होताच त्या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी केली. त्याचबरोबर ऑक्टोबर २०२१ पासून कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देऊन कर्मवीर काळे कारखान्याने कामगारांना वेतनवाढ लागू करणेसंदर्भात राज्यात सर्वप्रथम निर्णय घेत त्याची अंमलबजावणी केली आहे.