गुन्हे विषयक
कोयत्याने एकास मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेले फिर्यादी हे आपल्या पत्नीसमवेत शेतात काम करत असताना पढेगावातील आरोपी चंद्रभान माणिक गायकवाड,माणिक देवराम गायकवाड,श्रावण माणिक गायकवाड,वेणूबाई माणिक गायकवाड यांनी सामायिक बांधावरून गवताची मोळी घेऊन जात असताना त्याचा धक्का फिर्यादिस लागल्याचे कारणावरून फिर्यादिस कोयत्याने पाठीवर व डोक्यास मारहाण केली असल्याची फिर्याद भाऊराव देवराम गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी भाऊराव गायकवाड व त्यांची पत्नी हे आपल्या शेतात काम करत असताना आरोपी क्रं.एक चंद्रभान गायकवाड हा शेताचे बांधावरून जात असताना आरोपीच्या डोक्यावरील गिन्नी गवताच्या मोळीचा धक्का फिर्यादी भाऊराव गायकवाड यास लागला.या कारणावरून आरोपी चंद्रभान गायकवाड याने हातातील कोयत्याने फिर्यादीस पाठीवर व डोक्यास मारहाण केली आहे.व आरोपी माणिक गायकवाड याने लोखंडी फावड्याने मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे कासली येथील रहिवासी असून प्रमुख आरोपी चंद्रभान गायकवाड हे पढेगाव येथील आरोपी आहे.त्यांचे एकमेकशेजारी शेत असून त्यांचा सामायिक बांध आहे.त्या बांधावरून दोघेही जा-ये करत असतात.गुरुवार दि.११ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजेच्या सुमारास फिर्यादी भाऊराव गायकवाड व त्यांची पत्नी हे आपल्या शेतात काम करत असताना आरोपी क्रं.एक चंद्रभान गायकवाड हा शेताचे बांधावरून जात असताना आरोपीच्या डोक्यावरील गिन्नी गवताच्या मोळीचा धक्का फिर्यादी भाऊराव गायकवाड यास लागला.या कारणावरून आरोपी चंद्रभान गायकवाड याने हातातील कोयत्याने फिर्यादीस पाठीवर व डोक्यास मारहाण केली आहे.व आरोपी माणिक गायकवाड याने लोखंडी फावड्याने फिर्यादिस डोक्यावर मारहाण केली आहे.बाकी आरोपी श्रावण माणिक गायकवाड,वेणूबाई माणिक गायकवाड यांनी आपल्याला लाथाबुक्यांनी फिर्यादी व साक्षिदार पत्नी यांना मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३८६/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे हे करीत आहेत.