जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘त्या’अकरा गावातील पायाभूत सुविधा सुधारण्यास प्राधान्य-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील अकरा गावातील रस्त्यांची दुरवस्था आहे.रस्त्यांचा अनुशेष मोठा असून हां अनुशेष मोठा असला तरी तो भरून काढणे शक्य आहे.त्यामुळे मतदार संघाचा प्रतिनिधी या नात्याने या अकरा गावातील रस्त्यांची दुर्दशा हटवून नागरिकांना येणाऱ्या रस्ते,वीज आणि पाणी आदी पायाभूत सुविधांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी राहाता तालुक्यातील वाकडी येथे नुकतेच केले आहे.

“मतदार संघाच्या विकासासाठी जो निधी मिळवीन त्यामध्ये या अकरा गावांचा देखील तेवढाच वाटा आहे.संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे.त्याला हि अकरा गावे देखील अपवाद नाहीत.त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या आणि विजेच्या देखील समस्या आहेत.त्या दुर करू”-आ.आशुतोष काळे.कोपरगाव.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या राहाता तालुक्यातील वाकडी येथे ३ कोटी २५ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा (प्रजिमा८७) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच २४ लक्ष निधीतून वाकडी स्मशानभूमी ते किसनराव कोते घर,एकनाथ शेळके घर ते अमोल लहारे घरापर्यंत करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच जिल्हा नियोजन अंतर्गत व महावितरण एसीएफ योजनेतून दिलेल्या १०० केव्हीए ट्रान्सफार्मर लोकार्पण आ.काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी गौतम बँकेचे चेअरमन बाबासाहेब कोते,वाकडीचे सरपंच संपतराव शेळके, रामपूरवाडीचे सरपंच संदीप सुरडकर,पुणतांब्याचे माजी सरपंच मुरलीधर थोरात,जळगावचे सरपंच शिवाजी साबदे,तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप लहारे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ल शेळके,बाळासाहेब भोरकडे,प्रभाकर येलम, अरुण बोंबले,अशोक काळे,चंद्रशेखर लहारे,शंकरराव लहारे,शिवाजी जगताप,सार्वजनिक बांधकामचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे आदींसह महसूल,वीज वितरणचे कर्मचारी उपस्थित होते.

सदर प्रसांगी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मतदार संघाच्या विकासासाठी जो निधी मिळवीन त्यामध्ये या अकरा गावांचा देखील तेवढाच वाटा आहे.संपूर्ण मतदार संघातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे.त्याला हि अकरा गावे देखील अपवाद नाहीत.त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या आणि विजेच्या देखील समस्या आहेत.

महाविकास आघाडी सरकारने निळवंडे कालव्यांसाठी ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे निळवंडेच्या कामाला वेग आला असून निळवंडेचे पाणी या अकरा गावात पोहोचताच पाण्याची समस्या निश्चितपणे मार्गी लागणार आहे.वाकडी गावचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी शेती महामंडळाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू.गणेशनगर-श्रीरामपूर रस्त्यावरील पुलासाठी ९० लक्ष रुपये निधी तरतूद करण्यात आली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होवून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

विजेच्या बाबतीत मागणीनुसार रोहित्रे उपलब्ध करून देवून अजूनही रस्त्यांसाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close