कोपरगाव तालुका
कोपगावात राष्ट्रवादीचा”माझा प्रभाग,माझी जबाबदारी”उपक्रम

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापनदिनानिमित राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर कोरोनामुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘माझा प्रभाग,माझी जबाबदारी’ हा उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभागनिहाय औषध फवारणीचा प्रारंभ करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोपरगाव शहरात गुरुवार (दि.०३) पासून औषध फवारणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात ‘माझा प्रभाग,माझी जबाबदारी’ उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रभागनिहाय औषध फवारणी करण्यात येत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढलेला संसर्ग कमी करण्यासाठी आ. काळे यांनी केलेल्या उपाय योजनांमुळे कोपरगाव तालुक्यात एप्रिल महिन्यापासून वाढलेली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोपरगाव शहरात गुरुवार (दि.०३) पासून औषध फवारणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.कोपरगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात ‘माझा प्रभाग,माझी जबाबदारी’ उपक्रमाअंतर्गत शहरातील प्रभागनिहाय औषध फवारणी करण्यात येणार आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात निश्चितपणे कोरोना संसर्ग रोखण्यास आळा बसणार असून येणाऱ्या पावसाळ्याच्या तोंडावर विविध आजार उदभवण्याची शक्यता असते त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त औषध फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
यावेळी महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी,नगरसेवक मंदार पहाडे, संदीप पगारे, मेहमूद सय्यद,रमेश गवळी,फकीर कुरेशी,राहुल देवळालीकर, डॉ. तुषार गलांडे, संदीप देवळालीकर,रावसाहेब साठे, जावेद शेख, राजेंद्र जोशी, अशोक आव्हाटे, मनोज कडू, वाल्मिक लहिरे, एकनाथ गंगूले, कार्तिक सरदार, आकाश डागा, ऋषीकेश खैरनार, सागर लकारे, शफीक शेख,अझर शेख, ऋतुराज काळे, फकिरा चंदनशिव, तेजस साबळे, हारूण शेख, जमीर कुरेशी, शहीद कुरेशी,शाहरुख कुरेशी,अल्ताफ कुरेशी,जावेद कुरेशी,सोहेल कुरेशी आदी उपस्थित होते.