जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील शाळेत चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कोळपेवाडी येथील श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयात नुकतीच दि.११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी सकाळी ०८ वाजेच्या दरम्यान कोणातरी अज्ञात चोरट्याने शाळेतील १८ हजार २०० रुपये किमतीचे डी.व्ही.आर.,पॅनासॉनिक कंपनीचा एल.ई.डी.रोटर,सेटअप बॉक्स आदी साहित्य लंपास केले आहे.त्यामुळे शाळा व्यवस्थापनात भीतीचे वातावरण पसरले आहे.या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक राजु राघू पाचोरे (वय-५३) रा.बहादराबाद यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी हे आपल्या सुटी नंतर कुलूप लावून घरी गेले असता.पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी आपली हाथ की सफाई दाखवली आहे.त्यात त्यांने शाळेतील मुख्याध्यापक कक्षातील पाठीमागील खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश करून १८ हजार २०० रुपये किमतीचे डी.व्ही.आर.,पॅनासॉनिक कंपनीचा एल.ई.डी.रोटर,सेटअप बॉक्स आदी साहित्य लंपास केले आहे.

वर्तमानात चोरट्यानी नाना क्लुप्त्या लढवून चोऱ्या करण्याचा सपाटा सुरु केला असून दुचाक्या,घरफोड्या,यांना उधाण आले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली असून कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयात शाळेचे मुख्याध्यापक व शाळा कर्मचारी हे आपल्या सुटी नंतर कुलूप लावून घरी गेले असता.पाळतीवर असलेल्या चोरट्यांनी आपली हाथ की सफाई दाखवली आहे.त्यात त्यांने शाळेतील मुख्याध्यापक कक्षातील पाठीमागील खिडकीचे लोखंडी गज वाकवून आत प्रवेश करून १८ हजार २०० रुपये किमतीचे डी.व्ही.आर.,पॅनासॉनिक कंपनीचा एल.ई.डी.रोटर,सेटअप बॉक्स आदी साहित्य लंपास केले आहे.त्यामुळे शाळा व्यवस्थापनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक राजु राघू पाचोरे (वय-५३) रा.बहादराबाद यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गु.र.क्रं.३५७/२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close