जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव शहरात हाणामारी,तीन जखमी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या आरोपी राहुल रणजित गायकवाड,रणजित भास्कर गायकवाड,महेश रणजित गायकवाड,सोनू उर्फ रोहित रणजित गायकवाड,आदींनी आपल्या घरासमोर येऊन छोट्या मुलीस शिव्या दिल्याच्या कारणावरून जाब विचारल्याचा राग येऊन आपल्याला व साक्षिदार यांना शिवीगाळ करून हातातील फावड्याने मारहाण करून फिर्यादी दादा अण्णा गायकवाड,अण्णा गायकवाड,शिवाजी अण्णा गायकवाड,यांना जखमी केले असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीची मुलगी अंगणात खेळत असताना तिला आरोपीनी शिवीगाळ केली.त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी गेला असता त्याचा आरोपींना राग आला.व त्यातील आरोपी राहुल रणजित गायकवाड,रणजित भास्कर गायकवाड,महेश रणजित गायकवाड,सोनू उर्फ रोहित रणजित गायकवाड,आदींनी आपल्या घरासमोर येऊन आपल्याला व साक्षिदार यांना शिवीगाळ करून हातातील फावड्याने मारहाण करून फिर्यादीसह तिघांना जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी दादा गायकवाड व आरोपी राहुल गायकवाड हे एकाच गल्लीत व शेजारी-शेजारी राहतात.त्यांच्यात दि.१२ सप्टेंबर रोजी दुपारी ०४ वाजता फिर्यादीची मुलगी अंगणात खेळत असताना तिला आरोपीनी शिवीगाळ केली.त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी गेला असता त्याचा आरोपींना राग आला.व त्यातील आरोपी राहुल रणजित गायकवाड,रणजित भास्कर गायकवाड,महेश रणजित गायकवाड,सोनू उर्फ रोहित रणजित गायकवाड,आदींनी आपल्या घरासमोर येऊन आपल्याला व साक्षिदार यांना शिवीगाळ करून हातातील फावड्याने मारहाण करून फिर्यादी दादा अण्णा गायकवाड,अण्णा गायकवाड,शिवाजी अण्णा गायकवाड,यांना गंभीर जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यातील जखमीं फिर्यादी दादा अण्णा गायकवाड,अण्णा गायकवाड,शिवाजी अण्णा गायकवाड यांना उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.या प्रकरणी आरोपी विरुद्ध फिर्यादी दादा गायकवाड यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरक्षक भरत नागरे यांनी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.२८२/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मारदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close