जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

लोहगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी चेचरे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

लोहगाव (वार्ताहर)

राहाता तालुक्यातील लोहगाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शांताराम चेचरे व उपाध्यक्ष पदी पुन्हा भाऊसाहेब विश्राम चेचरे निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कै.ज्ञानदेव चेचरे यांचे कोरोनामुळे निधन झाले तरी त्यांच्या कामाचा ठसा ते त्यांच्या कार्यकाळात उठवून गेले त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर.नव्यानेच अध्यक्ष शांताराम चेेचरे व उपाध्यक्ष भाऊसाहेब विश्राम चेचरे यांनी गावातील तंटे एकोप्याने गावातच मिटवावे अशीच सर्वांची व गावकऱ्यांना अपेक्षा आहे.

तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव चेचरे यांचे कोरोना मुळे निधन झाल्यामुळे होते.रिक्त झालेल्या पदासाठी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावली होती.यावेळी अध्यक्षपदाची सुचना उपसरपंच सुरेश चेचरे यांनी मांडली व अनुमोदन बळीराम चेचरे यांनी दिले तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष कै.ज्ञानदेव रामजी चेचरे हे २००७ व २००८ या साली तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राज्यभर राबविले होते. गावातील तंटे गावातच मिटवावे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.लोहगाव गावात या अभियानात सहभाग घेतला होता.यावेळी स्वर्गीय ज्ञानदेव चेचरे यांनी तंटामुक्त समितीचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर त्या वेळी अध्यक्ष म्हणून केरूनाथ चेचरे यांनी काम पाहिले होते. कालांतराने केरूनाथ चेचरे यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर अध्यक्ष म्हणून कै ज्ञानदेव चेचरे यांची या समितीवर अध्यक्षपदी कै.ज्ञानदेव चेचरे यांची निवड करण्यात आली होती.कै.चेचरे यांनी समितीच्या कार्यात झोकून घेऊन काम केले गावातील तंटे गावातच मिटवण्याचे काम त्यांनी उपाध्यक्षपदाच्या काळात केले होते.तंटामुक्त अध्यक्ष केरूनाथ चेचरे व उपाध्यक्ष ज्ञानदेव चेचरे यांनी फलित म्हणून गावाला तालुक्यातील पहिला तंटामुक्त पुरस्कार त्यांच्या काळात मिळावा या वेळी तत्कालीन ग्रामसेवक सुहास शिरसाठ,लिपिक दिगंबर शिरसाठ यांचे विशेष सहकार्य त्यांना लाभले होते. कै.ज्ञानदेव चेचरे यांचे कोरोनामुळे निधन झाले तरी त्यांच्या कामाचा ठसा ते त्यांच्या कार्यकाळात उठवून गेले त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर.नव्यानेच अध्यक्ष शांताराम चेेचरे व उपाध्यक्ष भाऊसाहेब विश्राम चेचरे यांनी गावातील तंटे एकोप्याने गावातच मिटवावे अशीच सर्वांची व गावकऱ्यांना अपेक्षा आहे.

निवड झालेल्या अध्यक्ष शांताराम चेचरे व उपाध्यक्ष भाऊसाहेब चेचरे यांची विखेेे पाटील कारखान्याचे मा.संचालक भाऊसाहेब चेचरे सरपंच स्मिता चेचरे उपसरपंच सुरेश चेचरे,सरपंच गणेश चेचरे,दत्तात्रेय चेचरे,ग्रामसेविका आहेर कविता,संजय सुरडकर,सतीश गिरमे,विलास गोपाळे,राजेंद्र इनामकेे,बाळासाहेब दरंदले,बाळासाहेब वांगे,दिलीप चेचरे,राजेंद्र इनामक,सुमन चेचरे,दयाबाई बोर्डे,आरोग्य सेविका,पत्रकार कोंडीराम नेहे,कृष्णा चेचरे,अड्.आशिष गिरमे,अभिजीत चेचरेआदिनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close