कोपरगाव तालुका
अफगाणिस्तानमधील ‘त्या’ घटनेबद्दल निषेध का नाही?-कोपरगाव नगराध्यक्षांचा सवाल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अफगाणिस्तानातील कंदाहार व हैरात येथील भारतीय दुतावासांची कुलुपे तोडून घुसखोरी करणाऱ्या,नासधुस करणाऱ्या व दूतावासांची वाहने पळवून नेणाऱ्या व महिलां भगिणींचे श्वास दाबून टाकणाऱ्या तालिबानी दहशतवाद्यांचा सर्वच भारतीयांनी निषेध केला करायला हवा असे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका निवेदनाद्वारे नुकतेच केले आहे.
“देशात थोडे काही घडले कि मोदी-शहा-योगी यांच्यावर पातळी सोडून टिका करणाऱ्या सर्व महान नेत्यांनी आता बुद्धी कुठे गहाण ठेवली आहे ? भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो असा गैरप्रचार करणारे राजीनामा देण्याचे नाटक करणारे व पुरस्कार परत करणारे ढोंगी आहेत.अफगाणिस्तानात तालिबानी मुस्लिम भगिनींची विटंबना व हत्या करत असताना गप्प बसणारे नेभळट व स्वार्थी आहे”-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगर परिषद.
तालिबानी दहशतवाद्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.तालिबानी दहशतवादी संघटनांनी नुकताच अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर ताबा मिळवला.अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देखील तालिबान्यांसमोर शरणागती पत्कारत राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या आणि ते पळून गेले.त्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे.तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये कायदे-कानून लागू करण्यास सुरुवात केली आहे.या कायद्याचा सर्वात जास्त फटका त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांना बसणार आहे.तालिबान्यांनी अफगाणिस्तानमधील महिलांसाठी दहा नवीन आणि कठोर नियम लागू केले आहेत.शरियानुसार तयार करण्यात आलेल्या या नियमांचे पालन करण्याची महिलांना सक्ती करण्यात आली आहे.एवढेच नाही तर या नियमांचे उल्लंघन केले तर या महिलांना कठोर शिक्षेची तरतूद देखील या कायद्यामध्ये करण्यात आली आहे.त्यामुळे अफगाणिस्तानमधील महिलांच्या अडचणीत वाढ झाली आहे.घराबाहेर जाताना महिलांना बुरखा परिधान करणे बंधनकारक आहे.महिलांच्या येण्याची चाहूल पुरुषांना लागता कामा नये.या साठी महिलांनी पायात हिल्स वापरू नये.सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज ऐकू येता कामा नये.तळ मजल्यावर असलेल्या घरांच्या खिडक्यांच्या काचा रंगवलेल्या असल्या पाहिजे.जेणे करुन घरात राहणाऱ्या महिला दिसणार नाहीत.महिलांना फोटो काढण्यास बंदी असेल.महिलांची छायाचित्रे वृत्तपत्रे,पुस्तक आणि घरांमध्ये लावता कामा नये.महिला शब्द कुठल्याही जागेच्या नावावरुन हटवण्यात यावा.घराच्या बाल्कनीमध्ये तसेच खिडकीमध्ये महिला दिसता कामा नये.महिलांनी कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता कामा नयेत.महिलांनी नेल पेंट लावता कामा नये.तसंच त्यांनी कुटुंबियांच्या मर्जी शिवाय लग्न करु नये.असे कठोर नियम लागू केले आहे.त्यांनी या नियमांचे पालन केले नाहीतर त्याना भर चौकात नाक कापणे,फटके देणे मृत्युदंड देणे आदी कठोर शिक्षा देण्यात येतात त्यामुळे या देशातील महिलांना जगणे मुश्किल झाले आहे.याबाबत मानवाधिकाराच्या नावाने गळा काढणारे नागरिक व संघटना आता कोणत्या बिळात जाऊन बसले हे समजायला मार्ग नाही शिवाय याबाबत एरवी नको त्या विषयात नाक खुपसणाऱ्या संघटना सुप्रसिद्ध (?) नेते काहीही बोलायला तयार नाही हा सन्नाटा विचार करायला लावणारा आहे.त्यावर नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी नेमकी वाचा फोडली आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की,”आपल्या देशाच्या दुतावासांची दुरावस्था होत असताना भारतातील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नेत्यांनी एकजुटीने विरोध-निषेध नोंदवून भारतीय संघटित आहेत हे जगाला दाखवून देणे गरजेचे आहे.तेथील मुस्लिम महिला,भगिनी,मुलीवर अत्याचार होत आहे, रात्रंदिवस विटंबना सुरू आहे.मानवतेला खाली मान घालायला लावणाऱ्या घटना घडत असतांना भारतातील तथाकथित सर्वधर्मसमभाववाले,स्त्रीमुक्ती,स्त्री समानता-सन्मान यासाठी सतत गळे काढणाऱ्या संघटना आता का बोलत नाहीत.मुस्लिम महिलांवर अत्याचार होत असूनही भारतातील मुस्लिम नेतेही का गप्प आहेत ? तेही तालिबान्यांना घाबरतात कि काय ? की त्यांचा तालिबान्यांना पाठिंबा आहे ?असा तिखट सवाल उपस्थित केला आहे.
थोडे काही घडले कि मोदी-शहा-योगी यांच्यावर पातळी सोडून टिका करणाऱ्या सर्व महान नेत्यांनी आता बुद्धी गहाण ठेवली असावी असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.कारण भारतात मुस्लिमांवर अन्याय होतो असा गैरप्रचार करणारे राजीनामा देण्याचे नाटक करणारे व पुरस्कार परत करणारे ढोंगी आहेत.अफगाणिस्तानात तालिबानी मुस्लिम भगिनींची विटंबना-हत्या करत असताना गप्प बसणारे नेभळट व स्वार्थी असल्याची टीकाही नगराध्यक्ष वहाडणे यांनी शेवटी केली आहे.