गुन्हे विषयक
घोयेगावात 75 वर्षीय महिलेची अज्ञात कारणाने आत्महत्या,तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
संपादक -नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील घोयगाव येथील रहिवाशी असलेली 75 वर्षीय महिला जनाबाई पांडुरंग अहिरे हिने आपल्या राहत्या घरात स्वतःला जाळून मृत्यूला कवटाळले असल्याची विदारक माहिती हाती आली आहे.त्यामुळे घोयगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शक्य तो या वयात कोणी आत्महत्या करीत नाही.व आत्महत्या करावयाची ठरविल्यास साधारणपणे कोणीही व्यक्ती हि घरात करत असताना या जेष्ठ महिलेने घराच्या बाहेर आत्महत्या का केली हा चक्रावून टाकणारा सवाल निर्माण झाला आहे.पंधरा वर्षांपूर्वी या महिला आपली जमीन जुमला विकून आपल्या मुलगी व जावयास सदरचा पैसा दिला असल्याची माहिती मिळते आहे.त्यामुळे या आत्महत्ये बाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
घोयगाव येथील रहिवासी असलेल्या या महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्याना एक मुलगी असून ती विवाहित आहे.तिचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते.मयत महिलेला अस्थमाचा आजार असल्याची विश्वसनिय माहिती मिळते. त्या आजाराला वैतागून त्यांनी शनिवार 9 नोव्हेंबर रोजी पूर्वी आपल्या घरासमोर स्वतःला जाळून आपली जीवनयात्रा संपवली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात त्याच गावातील शेतकरी अण्णासाहेब चांगदेव गव्हाळे (वय-42 वर्ष ) यांनी खबर दिली आहे.कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी अ. मृ.रजी. नं.75/2019 सी.आर.पी.सी.174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपस पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहे.