गुन्हे विषयक
कर्मवीरनगर येथून दुचाकीची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या कर्मवीर नगर येथून आपल्या घरासमोर उभी केलेली सुमारे पंचवीस हजार रुपये किमतीची हिरो एच.एफ.डिलक्स (क्रं. एम.एच.17 सी.ए.4790) हि आपल्या घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने आपल्या संमतीविना शनिवार दि.9 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्याची फिर्याद राजेंद्र लक्ष्मण राऊत (वय-55) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.नं.381/2019 भा.द.वि.कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.