जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मद्य पाजण्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण,कोपरगावात दोन जखमी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील उपनगर असललेल्या खडकी येथील मेहुण्यास दारू पाजण्याच्या कारणावरून आरोपी शाम सुखदेव बढे,रा.जुना टाकळी रोड खडकी याने फिर्यादिस व त्याच्या आईस लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी राजेंद्र नामदेव बढे (वय-२५) याने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे खडकी सह कोपरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी राजेंद्र बढे हा आपल्या दुचाकीवरून गोदावरी दूध संघात कर्तव्यावर जात असतांना फिर्यादीचे घरासमोरच आरोपी शाम बढे याने त्यास अडवले व त्यास म्हणाला की,”तू, माझ्या मेहुण्याला दारू का पाजली ? याचा आरोपीस राग आल्याने त्याने अर्वाच्च शिवीगाळ करत आपल्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी राजेंद्र बढे याच्या डोक्यात व त्याची आई श्रीमती परिगाबाई नामदेव बढे (वय-५०) यांस मारहाण करून जखमी केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राजेंद्र बढे व आरोपी शाम बढे हे एकमेकांचे चुलत भाऊ आहे.त्यांचे किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे होतात.अनेक वेळा माध्यस्थानी ते मिटवले आहे.मात्र त्यात काही काळ गेला की पुन्हा पुन्हा त्याच घटनांची पुनरावृति होताना दिसत आहे.अशीच घटना दि.शनिवार दि.२४ जुलै रोजी घडली असून.सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र बढे हा आपल्या दुचाकीवरून गोदावरी दूध संघात कर्तव्यावर जात असतांना फिर्यादीचे घरासमोरच आरोपी शाम बढे याने त्यास अडवले व त्यास म्हणाला की,”तू, माझ्या मेहुण्याला दारू का पाजली ? याचा आरोपीस राग आल्याने त्याने अर्वाच्च शिवीगाळ करत आपल्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादी राजेंद्र बढे याच्या डोक्यात व त्याची आई श्रीमती परिगाबाई नामदेव बढे (वय-५०) यांस मारहाण करून जखमी केले आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.जखमीस कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी फिर्यादी राजेंद्र बढे याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२३३/२०२१ भा.द.वि.कलम ३२६,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे तपास करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close