जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर गुन्हेगारास भर चौकात मारू-…या नेत्याचा इशारा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तर त्या गुन्हेगारास आपण भर चौकात मारू असा गंभीर इशारा कोपरगावचे राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी दिल्याने आज त्यांचे कार्यकर्त्यांना कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात आक्रमक रूप पाहायला मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

“कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करून या मागील खरे कारण आरोपींच्या प्रभागातील ८७ लाखांची गटारीचे काम आहे.ते काम त्यांना मिळण्यास अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही त्यामुळे त्यांना २५-३० लाखांचा मलिदा मिळाला नाही ही खरी खदखद आहे.त्यामुळे ही मंडळी नाराज होती”सुनील गंगुले,अध्यक्ष,कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस.

कोपरगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नुकताच गौतम सहकारी बँकेच्या कोपरगाव शाखेच्या प्रांगणात पद वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी ट्रस्टचे मानद सचिव धरमशेठ बागरेचा हे होते.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनिल गंगूले,तालुकाध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषदेचे गटनेते विरेंन बोरावके,कोपरगाव पंचायत समितीचे उपसभापती अर्जुन काळे,प्रशांत वाबळे,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,संदीप पगारे,रमेश गवळी,सुनील बोरा,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,शहराचे तालुकाध्यक्ष नवाज कुरेशी,युवकाचे सचिव मनोज कडू,फकीर कुरेशी,गिरमे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”काही दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील कार्यकर्ता महेश उडावंत याला सामाजिक संकेतस्थळावर काही मजकूर प्रसिद्ध केल्यावर काही असामाजिक तत्त्वांनी घरी जाऊन धमक्या दिल्या होत्या.त्यावर त्याने योग्य भूमीका घेतली होती तिचे त्यांनी स्वागत करून आगामी काळात असा प्रकार घडला तर आपण या लढाईत स्वतःसह आपले कार्यकर्ते उतरू असा इशारा दिल्याने एरव्ही शांत स्वभावाचे गणले जाणारे आ.आशुतोष काळे आज गत दोन वर्षात प्रथमच आक्रमक पाहायला मिळाले आहे.

दरम्यान आपल्याला गत विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी साथ दिल्याने आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असा दावा करून आगामी कालखंडात कोपरगाव पालिकेच्या निवडणूक असल्याने कार्यकर्त्यानी महत्वाची भूमिका पार पाडायची असल्याचे सूतोवाच करून कोपरगाव पालिकेतील वर्तमान राजकीय घडामोडीचा उल्लेख करून सत्ताधाऱ्यांना केवळ आपल्यावर खापर फोडायचे आहे.मात्र आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श आहे त्याप्रमाणे आपण आगामी काळात महिला भगिनींचे संरक्षण करून न्याय द्यायचा आहे.व जनतेला कोरोना लसीकरणास साथ द्यायची असल्याचे सांगून मदत करण्याचे आवाहन शेवटी केले आहे.

दरम्यान सदर प्रसंगी सुनील गंगूले यांनी,”भाजप कोल्हे गटावर जोरदार हल्लाबोल केला व नगरपरिषद अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध करून या मागील खरे कारण आरोपींच्या प्रभागातील ८७ लाखांची गटारीचे काम आहे.ते काम त्यांना मिळण्यास अधिकाऱ्यांनी सहकार्य केले नाही त्यामुळे त्यांना २५-३० लाखांचा मलिदा मिळाला नाही ही खरी खदखद आहे.त्यामुळे ही मंडळी नाराज होती असे सांगून या प्रकरणाची पोलखोल केली आहे.व स्वतःचे पाप झाकण्यासाठी त्यांनी छत्रपतीं सारख्या महापुरुषांचे नाव घेतले ही घटना निंदनीय असल्याचे सांगून या घटनेचा जेवढा निषेध करू तेवढा थोडा असल्याचे सांगितले आहे.कारागृहात जाऊनही ही मंडळी नीट राहिली नाही यांनी आपल्याच साथीदारांना सोडून देऊन दवाखान्याची गार हवा खाण्याचे पातक केले आहे.हे अधिकाऱ्यांच्या हातात किती लाखांचे घड्याळ आहे हे पाहातात मात्र यांनी किती मोठ्या इमारती बांधल्या हे ते का सांगत नाही असा भीमटोला लगावला आहे.माजी आ.काळे यांनी पाण्याच्या तलावासाठी दोन कोटींचा निधी आणला तर या मंडळींनी तलावाचे काम करणाऱ्या जे.सी.बी.ची मोडतोड केल्याची त्यांनी आठवण करून दिली व सेनेचे नाव घेऊन ही मंडळी संजीवणीच्या पाकिटावर पोसले गेल्याची प्रखर टीका करून सेनेचे नाव घेण्याचा या मंडळींना अधिकार नसल्याचे शेवटी सांगितले आहे.

दरम्यान यावेळी कारगिल शहिद दिनानिमित्त शहिद सैनिकांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले तर सूत्रसंचलन यांनी केले तर उपस्थितांना शहर उपाध्यक्ष बाळासाहेब रुईकर,नवाज कुरेशी,अशोक आव्हाटे,महेश उदावंत,धनंजय कहार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर युवकाचे उपाध्यक्ष संदीप कपिले आभार यांनी मानले आहे.त्यावेळी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close