गुन्हे विषयक
टपरी फोडल्याचा जाब विचारुन रॉडने मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या फिर्यादी सोमनाथ भाऊराव भोसले (वय-३५) यांनी आरोपी किशोर विठ्ठल भोसले,विठ्ठल भोसले,विकास राजू चव्हाण सर्व रा.गोपाळपुरा शिंगणापूर यांनी फिर्यादिस,”तू,आमची टपरी का फोडली ? असा सवाल विचारला व आरोपी किशोर भोसले याने शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारून दुखापत केली तसेच विठ्ल भोसले व विकास चव्हाण यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
शिंगणापूर येथील आरोपी किशोर विठ्ठल भोसले,विठ्ठल भोसले,विकास राजू चव्हाण सर्व रा.गोपाळपुरा शिंगणापूर यांची टपरी अज्ञात चोरट्याने फोडली होती.त्यांचा फिर्यादी सोमनाथ भोसले यांचेवर संशय होता.त्यांनी याबाबत दि.०७ जुलै रोजी रात्री ०७.४५ वाजता याबाबत फिर्यादिस त्याच्या गोपाळपुरा येथे जाऊन त्याचा जाब विचारला आहे त्यातून हि फिर्यदिस मारहाण झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,आरोपी किशोर विठ्ठल भोसले,विठ्ठल भोसले,विकास राजू चव्हाण सर्व रा.गोपाळपुरा शिंगणापूर यांची टपरी अज्ञात चोरट्याने फोडली होती.त्यांचा फिर्यादी सोमनाथ भोसले यांचेवर संशय होता.त्यांनी याबाबत दि.०७ जुलै रोजी रात्री ०७.४५ वाजता याबाबत फिर्यादिस त्याच्या गोपाळपुरा येथे जाऊन त्याचा जाब विचारला आहे.त्यात ते “तू,आमची टपरी का फोडली” असे म्हणाले होते.व त्यांनी फिर्यादी सोमनाथ भोसले यास पहिला आरोपी किशोर भोसले याने शिवीगाळ करून लोखंडी रॉडने डोक्यात मारून दुखापत केली तसेच विठ्ल भोसले व विकास चव्हाण यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी सोमनाथ भोसले याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.जखमींवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१२/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. दारकुंडे हे करीत आहेत.