जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शिर्डीतील पोलिसाने वीस हजारांची लाच मागितली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या भाऊसाहेब संपत सानप (वय-४४) याने कोळपेवाडी येथील वाळूचा व्यवसाय असून वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी फिर्यादी याचे कडून उपस्थित पंचासमक्ष तीस हजारांची लाच मागीतल्याच्या कारणावरुन लाच लुचपत विभागाकडून सापळा लावून फिर्यादी कडून तडजोडीअंती २० हजार रुपये घेण्याचे मान्य केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत नाशिक लाचलुचपत विभागाने आजपर्यंत अनेक महसूल अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.व त्यांना अटक केली आहे.तरीही लाच खाण्याचे प्रमाण काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.महसूल व त्या पाठोपाठ पोलीस विभागाने आता लाच खाण्यात क्रमांक लावला आहे.या कडे लोकप्रतिनिधी अद्याप डोळे उघडताना दिसत नाही हे विशेष ! अशीच घटना कोळपेवाडी येथे घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात आजपर्यंत नाशिक लाचलुचपत विभागाने आजपर्यंत अनेक महसूल अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.व त्यांना अटक केली आहे.तरीही लाच खाण्याचे प्रमाण काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाही.महसूल व त्या पाठोपाठ पोलीस विभागाने आता लाच खाण्यात क्रमांक लावला आहे.या कडे लोकप्रतिनिधी अद्याप डोळे उघडताना दिसत नाही हे विशेष ! अशीच घटना कोळपेवाडी घडली असून येथील फिर्यादी याचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे.दि.२७ मे रोजी फिर्यादीचे वाहन पोलिसांनी पकडले होते.ते सोडून देण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील संबंधित पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याने फिर्यादी कडे दि.२७ मे रोजी ०८ वाजेच्या सुमारास तीस हजारांची रक्कम मागितली होती.व तडजोडी पोटी वीस हजार रुपये घेण्यासाठी फिर्यादीने लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष व पंचासमक्ष वीस हजार रुपये मागताना त्याचा पुरावा तयार केला आहे.त्या प्रकरणी त्याच्या विरोधात आज सकाळी ६.१२ वाजता लाचलुचपत विभागाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या कारवाईत नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक साळुंखे,श्री पालकर,आदींनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पोलीस नाईक भाऊसाहेब सानप याचे विरुद्ध आपले दप्तरी गुन्हा नोंद क्रं.२१५/२०२१ लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सी.बी.पालकर हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close