जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरु

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

तहसील कार्यालय कोपरगाव येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा शुभारंभ आज आ.आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.

ओरिसातील चक्रीवादाळानंतर भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग,शास्त्रीय संशोधनातील संस्था,शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला.परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली.२०१९ साली आलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा कायदा लागू करण्यात आला.

जगभरातील आपत्तींच्या घटना २०व्या शतकातील आठव्या दशकात खूप वाढल्या होत्या. प्राणहानी आणि वित्तहानी शिगेला पोहोचली होती.२०व्या शतकातले शेवटचे दशक हे संयुक्त राष्ट्रसंघाने आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी ‘डिझास्टर रिस्क रिडक्शन’चे दशक म्हणून घोषित केले होते. सगळ्या राष्ट्रांनी आपापल्या व्यवस्थापनानुसार दंडक स्थापन करण्याचा प्रयत्न केला. धोका कमी करण्यासाठी अनेक दंडक जगभरात स्थापन केले गेले. जगभरात एक गोष्ट निश्चित मानली गेली की, आपत्ती आल्यानंतर केल्या गेलेल्या कार्यवाहीपेक्षा धोका कमी करण्यासाठी केलेली कार्यवाही महत्त्वाची असते. भारतात १९९३ साली ओडिशाच्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्तिदरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली.२०१९ साली आलेल्या कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांत हा कायदा लागू करण्यात आला.त्यानुसार हि कार्यालयाने सुरु करण्यात आलेली आहेत.त्यानुसार कोपरगावात हे कार्यालय सुरु केले आहे.

या वेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दिलीप शिंदे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलगंगूले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार आपत्ती व्यवस्थापन पथकातील कर्मचारी आदी उपस्थित होते.

अतिवृष्टी,महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची मोठी मदत होणार आहे.यावेळी पावसाळ्याच्या आधी तालुक्यातील ओढे-नाले साफ करून घेण्याचा सूचना आ. काळे यांनी जलनि:सारण विभागाला दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close