गुन्हे विषयक
उसाचे शेतात महिलेचा विनयभंग,कोपरगावात एकमेकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील बोलकी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या एकतीस वर्षीय महिलेचा ती आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना त्याच गावातील आरोपी प्रसाद भगवानदास महाले व गौरव भगवानदास महाले या दोघांनी दि.१३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास ऊसाचे शेतात (गट क्रं.१५) मध्ये ओढले व तिच्या अंगावरील कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केला तिचे नातेवाईक तिला सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केली असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या घटनेत या दोन्ही गटांचा जमिनीचा वाद कोपरगाव न्यायालयात सुरु असून यातील विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबास या वादग्रस्त जमिनीवर कर्ज काढू नये अशी विनंती विरोधी गटाने करूनही त्यांनी ऐकले नाही त्यामुळे हे भांडण सुरु झाल्याची माहिती आहे.त्यातून या दोन्ही गटात भांडण होऊन ते विकोपाला गेले आहे.त्यामुळे दोन्ही गटांनी पोलिसांत एकमेकाविरोधात गुन्हे दाखल केले असल्याची विश्वसनीय माहिती उपलब्ध झाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि दि.१३ जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या नातेवाईकांसह रस्त्याने जात असताना आरोपी प्रसाद महाले व त्याचा भाऊ गौरव महाले या दोघांनी तिला उसाचे शेतात ओढले व तिच्या अंगावरील कंपडे फाडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.त्या महिलेची तिच्या बरोबर असलेल्या नातेवाईकांनी तिची सुटका करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या आरोपीनी लोखंडी रॉडच्या सहाय्याने मारहाण केली आहे.व जीवे मारण्याची धमकी व शिवीगाळ केली असल्याची फिर्याद या महिलेने काल रात्री आठ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद महाले व गौरव महाले यांचे विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१४/२०२१ भा.द.वि.कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,५०९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
विरोधी गटाचाही पोलिसांत गुन्हा दाखल
दरम्यान या आधी मनीषा प्रसाद महाले या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला असून त्यात त्यांनी वरील विनय भंगाबाबत तक्रार करणाऱ्या महिलेच्या व तिच्या अन्य नातेवाईक आरोपी मीनाक्षी भगवान दास महाले,भगवान दास पंढरीनाथ महाले,रचना शिवाजी महाले,शिवाजी पंढरीनाथ महाले,रंजना रामदास महाले,रामदास पंढरीनाथ महाले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यात वरील आरोपीनी गैरकायद्याची मंडळी जमवून आपल्याला घराबाहेर बोलावून,” तू,आमच्या भांडणात का पडते,तुझा काही एक संबंध नाही.ती जमीन आमची आहे.ती तुला मिळणार नाही.फिर्यादिस आरोपी मीनाक्षी महाले हिने शिवीगाळ करून मारहाण करून धक्काबुक्की करून आरोपी रचना महाले व रंजना महाले यांनी फिर्यादीस धक्का देऊन व मारहाण करून खड्यात ढकलून दिले त्यामुळे तिचा उजवा पायाच्या हाडास तडा गेला आहे. दरम्यान फिरयडीचा पती व मुलगा हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांना पण शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी गु.र.क्रं.२०८/२०२१ भा.द.वि.कलम १४३,१४७,१४९,३२५,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक दौलतराव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.आर.वाखुरे हे करीत आहेत.