जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जनतेच्या स्मरणात राहणारा विकास करून दाखवणार-आ.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

लोकप्रितिनिधी येतात आणि जातात मात्र कोणत्या लोकप्रतिनिधींनी कोणती विकासकामे केली याचा हिशोब जनतेकडे असतो. काळे परिवाराला मतदार संघातील जनतेने ज्या ज्यावेळी सेवा करण्याची संधी दिली त्या त्यावेळी मतदार संघाचा विकास झाला आहे.हा विकासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या स्मरणात राहील असा मतदार संघाचा विकास करून दाखवणार असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी जवळके येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.सदर प्रसंगी सभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे,आनंदराव चव्हाण, सरपंच थोरात,राहुल रोहमारे,रोहिदास होन, देवेन रोहमारे,नंदकिशोर औताडे, किसन पाडेकर,युवराज गांगवे,ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर, सिकंदर इनामदार,राजेंद्र औताडे,राहुल जगधने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी सभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे,आनंदराव चव्हाण, सरपंच थोरात,राहुल रोहमारे,रोहिदास होन, देवेन रोहमारे,नंदकिशोर औताडे, किसन पाडेकर,युवराज गांगवे,ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर, सिकंदर इनामदार,राजेंद्र औताडे,राहुल जगधने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,अभियंता उत्तमराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की,”माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील गोदावरी नदीवर बांधलेले पूल व बांधलेल्या विविध शासकीय इमारती त्यांच्या विकासकामांची साक्ष देत आहेत. जवळके व परिसरातील गावांसाठी जीवनवाहिनी असलेली उजनी चारी सिंचन योजना माजी आ.काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात पुनर्जीवित करून २०१४ पर्यंत नियमितपणे चालू ठेवली असल्याचा दावा केला.त्या प्रमाणे आपण देखील जवळके व परिसरातील गावांचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांना अपेक्षित असणारे विकासकामे करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close