गुन्हे विषयक
शुक्ला नामक तलाठी लाच घेताना अटक,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील कामगार तलाठी सुशील राजेंद्र शुक्ला (वय-३२) याने तक्रारदाराकडून वाळूचोरीचे वाहनावर कारवाई टाळण्यासाठी रुपये २८ हजार रुपयांची लाच घेताना शनिवार दि.२९ मे रोजी अटक करण्यात आली असल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.या पूर्वीही कोपरगाव तालुक्यात तीन तलाठी या विभागाने गतवर्षी जेरबंद केले आहे हे विशेष !
दरम्यान या तलाठ्याबाबत आमच्या प्रतिनिधीने गत महिन्यात वाळूचोरीचे वाहन सोडण्यासाठी दूरध्वनीवरून संभाषण केलेली संवादाची क्लिप सामाजिक स्थळावर प्रसारित झाली होती.त्याची शहानिशा करून त्याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.त्या बाबत या निर्लज्ज तलाठ्याने एका वकिलामार्फत आमच्या प्रतिनिधीस नोटीस पाठवून आपली बदनामी झाल्याचा आव आणला होता. ‘तो’ किती कचकड्यासारखा होता ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
नगर जिल्हाधिकारी यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून अवैध वाळू उपसा करण्यास प्रतिबंध केलेला असताना वाळूचोर महसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने बिनधास्त वाळूचोरी करताना दिसत आहे.त्या बाबत आमच्या प्रतिनिधीने या पूर्वीच या वाळूचोरांचे व महसुली कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड केले होते.मात्र तरीही त्या पासून कोणताही बोध या महसुली अधिकाऱ्यांनी घेतलेला दिसत नाही उलट हि मंडळी अधिकच्या पैशाच्या मोहात पडताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून कोपरगाव येथील एका बत्तीस वर्षीय इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी ६८ हजार रुपये रकमेची मागणी धोत्रे येथील तलाठी सुशील शुक्ला या नादान तलाठ्याने केली होती.त्या नंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभाग नाशिक यांचेकडे रीतसर तक्रार केली होती.व त्या प्रमाणे लाचलुचपत विभागाने त्यासाठी कोपरगावात या तलाठ्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता.त्या नुसार त्यांनी तक्रारदाराने या तलाठ्याकडे तडजोड रक्कम म्हणून २८ हजार रुपये ठरवले होते.व ती रोख २८ हजारांची प्रक्रिया केलेली रक्कम लाच लुचपत विभागाने तक्रारदाराकडे सुपूर्त केली होती.त्या प्रमाणे हि रक्कम स्वीकारताना काल हा तलाठी पंचासमक्ष पकडला गेला आहे.त्या बाबतचे चलचित्रण व छायाचित्र लाचलुचपत विभागाने प्राप्त करून घेतले आहे.
हि कारवाई यशस्वीपणे राबविली ती नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांनी त्यासाठी त्यांना सहाय्यक अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे यांनी साहाय्य केले आहे.तर सापळा पथकात पोलीस नाईक प्रवीण महाजन,श्री गरुड,श्री.कराड.चापोशी, जाधव यांनी सहाय्य केले आहे.लाचलुचपत विभागाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.दरम्यान पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांनी नागरीकांना यलाचखोर अधिकाऱ्यांविरुद्ध आवाहन केले असून त्यात,नागरिकांकडे कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास आपल्याशी तात्काळ संपर्क साधावा असे म्हटले आहे.व त्यासाठी (अँन्टी करप्शन ब्युरो नाशिक,@ टोल फ्रि क्रं.-१०६४) टोल फ्री क्रमांक दिला आहे.
दरम्यान या तलाठ्याबाबत आमच्या प्रतिनिधीने गत महिन्यात वाळूचोरीचे वाहन सोडण्यासाठी दूरध्वनीवरून संभाषण केलेली संवादाची क्लिप सामाजिक स्थळावर प्रसारित झाली होती.त्याची शहानिशा करून त्याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती.त्या बाबत या निर्लज्ज तलाठ्याने एका वकिलामार्फत आमच्या प्रतिनिधीस नोटीस पाठवून आपली बदनामी झाल्याचा आव आणला होता. ‘तो’ किती काचेच्या कचकड्यासारखा होता ते पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या शिवाय हा तलाठी खास इतरत्र ठिकाणाहून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपली खास अर्थपूर्ण (!) कामगिरी पूर्ण करण्यासाठी घेतला असल्याची बातमी असून त्यांचे ऊत्तर महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यात संबंध निर्माण झाले होते.ते आता कोपरगावात पुन्हा सुरु झाले होते.त्यातून या तलाठ्याने चांगलाच हात धुवून घेण्याचे काम सुरु ठेवले होते.व तो त्यातील हिस्सा वाटा आपल्या वरिष्ठांला इमाने-इतबारे पोहचवत असल्याची विश्वसनिय माहिती हाती आली आहे.एका वाहनातून महिन्याकाठी दहा हजारांचा हप्ता वसुली तर काही ठिकाणी हिस्सेदारी सुरु असल्याचे वृत्त आहे.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्वितचर्वण सुरु आहे.