गुन्हे विषयक
महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केले,कोपरगावात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या आपल्या बहिणीच्या लग्नात केलेल्या खर्चाचे पन्नास हजार रुपये परत घेण्याच्या कारणावरून वेळोवेळी शिवीगाळ,शारीरिक मानसिक छळ करून,तू,”इथून निघून जा,इथे,राहू नकोस,नाहीतर तुला संपवल्याशिवाय राहणार नाही” असे म्हणून तिचे मानसिक खच्चीकरण करून तिला विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संवत्सर येथील आरोपी सासरा निवृत्ती बाळाजी दैने,सासू सिंधुबाई निवृत्ती दैने,दीर अक्षय निवृत्ती दैने रा.दैने वस्ती यांनी आपल्या बहिणीस आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या प्रकरणी फिर्यादी धनंजय पोपट सैंद्रे (वय-३२) रा.पंचाळे ता.सिन्नर यांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
आपली बहिण सोनाली सैंद्रे हिचे लन हे संवत्सर येथील तरुण सुनील दैने या तरुणाशी दि.१६ एप्रिल २०१४ रोजी करून दिले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी साधारण दोन महिन्यानंतर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली होती.त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नात खर्च केलेले पन्नास हजार रुपये परत घेऊन ये असे म्हणून तगादा लावला होता त्यातून हि दुर्घटना घडली आहे.
फिर्यादी धनंजय सैंद्रे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,आपली बहिण सोनाली सैंद्रे हिचे लन हे संवत्सर येथील तरुण सुनील दैने या तरुणाशी दि.१६ एप्रिल २०१४ रोजी करून दिले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सासरच्या मंडळींनी साधारण दोन महिन्यानंतर आपले रंग दाखविण्यास सुरुवात केली होती.त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नात खर्च केलेले पन्नास हजार रुपये परत घेऊन ये असे म्हणून तगादा लावला होता.त्यावरून ते वारंवार शिवीगाळ,मारहाण करून तिचा छळ करत होते.त्या रागातूनच त्यांनी आपले मेहुणे सुनील दैने यास व आपल्या मयत बहिणीला विभक्त करून दिले होते.व तिला तू इथून निघून जा,इथे राहू नकोस,नाहीतर तुला संपवल्या शिवाय रहाणार नाही”असे म्हणून तिचे मानसिक खच्चीकरण करत होते.तिला त्याचा त्रास असह्य झाल्याने तिने दि.२९ मे रोजी दुपारी १२.३७ वाजेच्या सुमारास नजीकच्या विहिरीत उडी मारून आपली जीवनयात्रा सम्पवली आहे.तिला वरील आरोपीनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप केला आहे.
या प्रकरणी आधी अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती.त्या नंतर तक्रार झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१६९/२०२१ भा.द.वि.कलम ३०६,४९८,(अ),५०४,५०६,३२३,३४ प्रमाणे आरोपी सासरे.सासू,दीर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहेत.