गुन्हे विषयक
मुलीसोबत लग्न केल्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“तुझ्या मुलाने माझ्या मुलीसोबत लग्न का केले” या कारणां वरून अर्वाच्च शिवीगाळ करून हातातील लाकडी दांड्याने मारहाण केली व पुन्हा आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याच्या कारणावरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला सुमन भाऊराव पवार (वय-३८) गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
येसगाव येथील आत्माराम घोरपडे यांचे शेतात यातील आरोपी राजू रंगनाथ मोरे,नंदू रंगनाथ मोरे,गोपी नंदू मोरे सर्व रा.गोपाळवाडा येसगाव ता. कोपरगाव यांनी फिर्यादिस,”तुझ्या मुलाने माझ्या मुलीसोबत लग्न का केले ? असा जाबसाल करत शिवीगाळ करून हातातील लाकडी दांडयांनी मारहाण केली आहे याबाबत कोपरगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेली फिर्यादी सुमन भाऊराव पवार (वय-३८)वर्ष यांनी फिर्याद दिली आहे की, दि.१६ मे रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास येसगाव येथील आत्माराम घोरपडे यांचे शेतात यातील आरोपी राजू रंगनाथ मोरे,नंदू रंगनाथ मोरे,गोपी नंदू मोरे सर्व रा.गोपाळवाडा येसगाव ता. कोपरगाव यांनी फिर्यादिस,”तुझ्या मुलाने माझ्या मुलीसोबत लग्न का केले ?असा जाबसाल करत शिवीगाळ करून हातातील लाकडी दांडयांनी मारहाण केली असून,पुन्हा आमच्या नादी लागलात तर जिवंत सोडणार नाही”अशी धमकी दिली असल्याची फिर्याद फिर्यादी महिलेने नुकतीच दाखल केली आहे.
फिर्यादीवरुन गु.र.न.व कलम-१६०/२०२१ भा.द.वी. कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४, प्रमाणे गुन्हा आपल्या दप्तरी दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेचा तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का.ए.एम.आंधळे हे करीत आहे.