जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोनाबाबत जनजागृतीची नवी संकल्पना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोरोनाने जगात सर्वत्र थैमान घातलेलं असताना व त्यावर अद्याप नवीन औषध तयार नसल्याने जनतेत जनजागृती हाच एकमेव उपाय असल्याने त्या साठी विविध संस्था नवनवीन संकल्पना राबवत असताना नाविण्यात अग्रणी असलेल्या समता नागरी सहकारी पतसंस्था यांनी आपल्या या अभियानात “वासुदेवाच्या स्वारी”ला समाविष्ठ करून त्याच्या रोजी रोटीचा प्रश्न काही अंशी शिथिल केला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

‘‘वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ, सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला, वासुदेव आला होऽऽ, वासुदेव आलाऽऽऽ,’’ हे गाणं ऐकलं की रंगीबेरंगी पोशाखातील लोभस ध्यान डोळ्यांसमोर उभं राहतं. वासुदेव म्हणजे अंगभरून पोशाख, हातात टाळ-चिपळ्या, डोक्‍यात विविधरंगी कवड्यांच्या माळांनी गुंफलेला मोरपिसाचा टोप,कपाळी गंध,गळ्यात विविध देवतांच्या माळा, कमरेला बासरी असं हवंहवंसं वाटणारं देखणं रूप. ऐटदार पेहरावातील या वासुदेवाला पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणत, दान मागत फिरताना पाहणं हा भल्या सकाळी मन प्रसन्न करणारा अनुभव असतो.त्याचा उपयोग जनजागृतीला करणे ही बाब आपला प्राचीन वारसा सांगणारी व भूतकाळात घेऊन जाणारी ठरल्यास नवल नाही.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख २१ हजार ०७७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ३० हजार २२१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ८८ हजार ४१८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ४३७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या रोडावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.ताळेबंदीचा इष्ट परिणाम आता स्पष्ट दिसू लागला असला तरी अद्याप धोका टळलेला नाही नगर जिल्हा अद्यापही धोक्यातून बाहेर आलेला नाही हे उघड आहे.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात काल अखेर ११ हजार ०७० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ०० हजार ९७१ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १६८ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४७ हजार ८३५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ९१ हजार ३४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २३.१४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार ९३१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८९.७१ टक्के आहे त्यामुळे हा धोका टाळणे अत्यंत गरजेचे असताना आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणखी तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे अशावेळी नागरिकांची जनजागृती हा विषय तितकाच कळीचा व नाजूक बनला असल्यास नवल नाही.हीच बाब हेरून या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी जनजागृती हा विषय मौल्यवान आहे ही बाब अवगत करून समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी या बाबत तत्परता दाखवत व स्वतः सहभागी होत जनप्रभोधनात गेली अनेक शतके कार्यरत असलेल्या वासुदेवाला समाविष्ट करून घेतले आहे.त्यामुळे हा विषय चर्चेच्या अग्रणी न आला तर नवल!

कोपरगाव शहरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असताना अनेक लोक बेफिकीर तरुण मुखपट्या न लावताच विनाकारण बाहेर फिरताना आढळत असून विनाकारण गर्दी करत आहेत.विविध वाढदिवस व तत्सम समारंभ आयोजित करून कोरोनाचा विषाणूला ढोल बडवून निमंत्रण देत आहे.परिणामस्वरूप कोरोनाचा अक्राळ-विक्राळ स्वरूप अनेकांना आपल्या दाढेत ओढत आहे.विशेष म्हणजे यात तरुणांचा समावेश आहे.

या साथीला रोखण्यासाठी अद्याप रामबाण औषध सापडलेले नाही.बाकी उपाय करूनही त्या उपायासह पैसा व्यर्थ जात आहे.अशातच लस एका वेळी देशातील मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस पुरविणे जादूच्या कांडीसारखे शक्य नाही.अशात जनजागृती हाच प्रभावी उपाय आहे हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही हीच नस ओळखून राज्य पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी ही वासुदेवाच्या स्वारीची नामी शक्कल लढवली असून शहराच्या गल्ली बोळात ही स्वारी आता जनजागृती करत आहे.त्यासाठी कोपरगाव बेटभागातील वासुदेव छबुराव सुपेकर यांच्या मदतीने कोरोनाविषयक जनजागृती अभियान सुरू केले आहे.ते शहरात फिरून लोकांना माहिती पत्रक देऊन गित गाऊन जनजागृती करत आहे व नागरिकांना संदेश देत आहे. समता पतसंस्थेच्या माध्यमातून आजतागायत अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले गेले आहेत.कोरोना प्रतिबंधक औषधांचे वाटप,किराणा वाटप,मार्गदर्शन शिबिर स्वच्छता अभियान आदी उपक्रम घेतले आहे.या अभियानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close