आरोग्य
कोपरगावात रुग्णवाढीसह मृत्यूदरही मंदावला
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १० हजार ६५७ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १ हजार १९२ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १५७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.४७ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४३ हजार ९५७ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ७५ हजार ८२८ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २४.२४ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार ३०८ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८७.३४ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ०९ हजार ६९४ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २६ हजार ५९१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ८० हजार ७६३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ३३९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान उद्या दि.१३ मे रोजी ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ज्या लाभार्थींनाी दि.२५ मार्चच्या आधी कोवॅक्सिनचा पहीला डोस घेतला आहे.त्यानांच “कोवॅक्सिन”चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी ०८ वाजता टोकण वाटप करण्यात येणार आहे.एकूण १२० डोस देण्यात येणार असून अन्य नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी करू नये असे आवाहन डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी नुकतेच केले आहे.