गुन्हे विषयक
शालेय तरुणीचा कोपरगावात विनयभंग,शहर पोलिसात गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील शिवाजी रोड भागात रहिवासी असलेल्या व कन्या शाळा येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या सोळा वर्षीय शालेय विद्यार्थिनींची कोपरगाव बेट भागातील आरोपी शैलेश राजेंद्र वाघ याने काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास छेड काढल्याने त्याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहरातील शिवाजी रोड परिसरात रहिवासी असलेली विद्यार्थिनी आपल्या आई वडील व आपल्या बहिणी समवेत रहाते. ती इयत्ता नववीत शिक्षण घेत असताना सदर ती सध्या कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एका कन्या शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. ती गत वर्षी इयत्ता नववीत शिक्षण घेत असताना ,व दररोज शाळेत येत असताना आरोपी तरुण हा आरोपी आपल्या दुचाकी वरून (क्रं. एम.एच.17 बी.एफ.5384)तिचा पाठलाग करून तिच्याशी लगट करून अश्लील हावभाव करत असे मात्र तिने भीतीपोटी हि बाब आपल्या घरच्यांना सांगितली नाही मात्र नंतर घरच्या माणसांनी तिची शाळा बंद केली होती मात्र दहावीची परीक्षा द्यायची असा तिने निश्चय केला असल्याने ती सध्या घरीच अभ्यास करीत आहे.काल या आरोपीने गैरफायदा घेत आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास सदर मुलीच्या घरी जाऊन सदर मुलगी कुठे आहे अशी विचारणा तिच्या आजीकडे करू लागला त्यावेळी सदर मुलगी घराबाहेर येऊन कोण आहे हे पाहत असताना त्याने मला तुझ्या सोबत बोलायचे आहे.तेंव्हा आपण त्याला बोलण्यास नकार दिला असता त्याने वाईट भावनेने सदर मुलीचा हात धरून शिवीगाळ करू लागला आपण त्यावेळी आरडा ओरडा केल्याने तो पळून गेला आहे.माझी त्याच्या विरोधात फिर्याद असल्याचे तिने आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.