खेळजगत
आत्मा मालिकमध्ये राज्यस्तरीय योगासन स्पर्धेला आरंभ
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ यांचे सहकार्यांने व योगा फेडरेशन आॅफ इंडिया सलंग्न महाराष्ट्र योगा असोसिएशन पुणे आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन प.पू.आत्मा मालिक माऊली यांचे उपस्थितीत प्रमूख पाहुणे रविंद्र नाईक जिल्हाक्रिडाअधिकारी नाशिक व डाॅ. संजय गवळी नाशिक यांचे हस्त दिप प्रज्वलन करून नुकतेच झाले आहे.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य योगाअसोशिएशचे अध्यक्ष संत परामानंद महाराज व संत मांदियाळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठठलराव होते, विश्वस्तं प्रकाश भट, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, असोशिएशनचे सचिव चंद्रकांत पांगारे, कार्यकारी सचिव जतिन सोळंकी, प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलिक योगेश गायक आदि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाक्रिडाधिकारी रविंद्र नाईक म्हटले की, आपल्याला आपल्याच शरीराची किंमत माहित नाही. शरीर हे अनमोल आहे. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आज खेळाकडे दुर्लक्ष होत आहे शिवाय सात्विक व पौष्टिक आहार टाळून आपली पिढी जंक फूडच्या मागे धावत आहे. त्यामुळे शारिरिक दृष्टया दुर्बल पिढी तयार होत आहे. मोबाईल व सोशल मिडियामुळे संवाद हरवत चालला आहे. मात्र आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये खेळाच्या माध्यमातून शारिरिक तंदुुरूस्ती ध्यानयोगाच्या माध्यमातून मानसिक व भावनिक तंदूरूस्ती तसेच योग्य आहार व विहाराचे कार्य करणारे हे एकमेव गूरूकुल आहे. तसेच यावेळी त्यांनी सर्व खेळाडूनां स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व शासकिय पातळीवरून योगाला जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याने योवळी त्यांनी सांगितले.
डाॅ. गवळी म्हटले की, गुरूशिष्य परंपरेचे चा गुरूकुलात दर्शन झाले. योग ही भारतीय प्राचीन संस्कृती आहे. ती आता जगमान्य झाली असून आपण सर्वांनी ती जपली पाहिजे व वाढविली पाहिजे. त्यासाठी योग महाविद्यालयांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच योग ही स्पर्धा नाही तर ही तनमनाची साधना आहे असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धा दि 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धा 11 वेगवेगळया वयोगटात होणार असून या स्पर्धेसाठी राज्यातून 1020 स्पर्धेकांनी सहभाग घेतला आहे. उद्घाटन कार्यक्रमावेळी आत्मा मालिक एन.डी.एच्या विद्याथ्र्यांनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. तर आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील विद्याथ्र्यांनी बहारदार नृत्यविष्कार सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. या स्पर्धां कालावाीत स्पर्धकांची व त्यांच्या समवेत असणारे मार्गदर्शक पंच, विविध पदााधिकारी यांची भोजन व निवास व्यवस्था आत्मा मालिकच्या वतीने करण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोशिएशनचें कार्यकरी अधिकारी जतीन सोळंकी यांनी केले तर उपस्थितांचे आभार नाशिक जिल्हा योग असोसिएशनचे सहसचिव सुभाष खांडे यांनी मानले.