गुन्हे विषयक
बायकोला क्रूर वागणूक,कोपरगावात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील माहेर असलेली मात्र भुसावळ जिल्हा जळगाव येथे सासर असलेल्या महिलेला तेथील आरोपी नवरा हेमंत रमेश ठाकरे,व सासू लताबाई रमेश ठाकरे यांनी,”तुझ्या नातेवाईकांकडून लग्नाचा झालेला पन्नास हजार रुपयांचा खर्च घेऊन ये,तुला मुलबाळ होत नाही,स्वयंपाक येत नाही,या कारणासाठी घरातील उलटनी गॅसवर तापवून आपल्याला तोंडावर,ओठावर, पाठीवर चटके देऊन क्रूर वागणूक दिली असल्याची फिर्याद सविता हेमंत ठाकरे (वय-२२) रा.पानकुरा,ता.भुसावळ हिने स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तो गुन्हा नुकताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील फिर्यादी महिला सविता ठाकरे हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पानकुरा येथील वर हेमंत ठाकरे याचाई बरोबर झाले होते.सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या परिवाराने आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला आहे.त्यानी काही वर्षा पासून त्रास द्यायला सुरुवात केली आहे.त्यातून हे प्रकरण उदभवले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील फिर्यादी महिला सविता ठाकरे हिचे लग्न पाच वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील पानकुरा येथील वर हेमंत ठाकरे याचाई बरोबर झाले होते.सुरुवातीला नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या परिवाराने आपले रंग दाखविण्यास प्रारंभ केला आहे.त्यानी काही वर्षा पासून त्रास द्यायला सुरुवात केली आहे.त्यात,”तुझ्या नातेवाईकांकडून लग्नाचा खर्च झालेले पन्नास हजार रुपये घेऊन ये,”तुला, मूलबाळ होत नाही,स्वयंपाक येत नाही,घरात काम जमत नाही” असे म्हणून नेहमी “आडून पाडून” बोलून लाथाबुक्क्यांनी काठीने मारहाण करून दुखापत केली तसेच दि.९ एप्रिल रोजी तर त्यांनी कहर केला असून भाकरी भाजण्याची उलटनी गॅस वर तापवुन आपल्या तोंडावर,ओठावर,पोटावर चटके दिले आहे व मला क्रूर वागणूक दिली असल्याची फिर्याद भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादी माहिला सविता हेमंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रं.१०९/२०२१ अन्वये दाखल करण्यात आला आहे पुढील तपास भुसावळ तालुका पोलिस ठाणे यांनीं कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार कुसारे हे करीत आहेत.