गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात दुचाकीस अपघात,एक ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर शिवारात कोपरगाव-संगमनेर शिवारात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने त्यात सोपान मंगल पवार (वय-३५) कोळपेवाडी ता कोपरगाव हे जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मयत हे आपल्या पत्नीला आणण्यासाठी संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे चालले होते.
कोपरगाव-संगमनेर हा राज्यमार्ग अत्यन्त खराब झाला असून या मार्गावर वाहने चालविणे अत्यंत जोखमीचे बनले आहे.त्यातून अनेक अपघात होत असून अनेकांची आपली जीवित व वित्त हानी होत आहे.या मार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती करणे अत्यन्त गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मयत यांच्या ताब्यात त्यावे वेळी हिरो सीडी डिलक्स हि दुचाकी (क्रं.एम.एच.०२ ए. एन.३६८४) ताब्यात होती.रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते अंजनापुर ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल मनोदीप या ठिकाणी असललेल्या वळणावर आले असता अज्ञात वहानाने त्यांना धडक दिल्याने हि दुघटना घडली आहे.त्यात सोपान पवार हे जागीच ठार झाले आहे.नजीकच्या वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली असता धडक दिलेले वाहन फरार झाले होते.त्यांनी हि बाब शिर्डी पोलिसांना कळवली असतां त्यांनी या अपघाताची त्यांनी नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.श्री माघाडे हे करीत आहेत.