गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात इंधन चोरी करणारी टोळी जेरबंद
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रक्ताटे वस्ती येथून समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या शिबिरातून अज्ञात चोरट्याने एक लाख तेरा हजार रुपये किमतीचे सुमारे ११४० लिटर डिझल चोरी करून फरार झालेली टोळी पकडण्यात कोपरगाव शहर पोलिसांना यश मिळाले आहे.त्यांच्या या तपासाचे कौतुक होत आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांचा सुळसुळाट असताना आता पहिल्यांदाच पोलीस सक्रिय झाले असल्याचे दिसत असून त्यांनी प्रथमच डिझल चोरी करणारी टोळी चोवीस तासाच्या आत जेरबंद केली आहे.त्यामुळे पोलीस अधिकारी हर्षवर्धन गवळी व त्याच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत रक्ताटे वस्तीवर समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या गायत्री कॉन्ट्रक्शन कंपनीचे तात्पुरते शिबिर लावण्यात आले आहे.या ठिकाणी दि.१६ फेब्रुवारी रोजी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी ०१ लाख १३ हजार २०० रुपये किमतीचे डिझेल,लुक्कास कंपनीचे स्वयंचलित स्टार्टर,अँमरोंन कंपनीचा विद्युत घट,अन्य एक ल्युमिनस कंपनीचा लाल रंगाचा विद्युत घट,चार विद्युत घटांची वायर,असा मोठा ऐवज चोरून नेल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात गु.र.क्रं.५५/२०२१ अन्वये दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व सहाय्यक फौजदार ससाणे,पोलिस नाईक दारकुंडे,पो.कॉ. गणेश मैड,संभाजी शिंदे,खारतोडे, कुळधर,कुंढारे आदींचे दोन पथके तयार करून घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी करून गुप्त बातमीदारामार्फत बातमी काढून आरोपींपर्यंत पोहचले आहे.या गुन्ह्यात आरोपी अमोल मच्छीन्द्र आहेर रा.वाकडी,ता.राहाता,चेतन अरविंद गिरमे,रा.धारणगाव, ता.कोपरगाव,राजीवसिंह राम आसरेसिंह रा.मर्गुपुर पो.तेजीबझार जि.जोउनपुर,उत्तर प्रदेश,अगंदकुमार रामपाल बिंद,रा.राम नगर ता.सहागंज,जिल्हा जोउनपुर उत्तर प्रदेश,आदी चार जणांना अटक करून त्यांच्याकडून ०२ लाख ३६ हजार १५० रुपये किमतीचा माल त्यात एक टाटा कंपनीचा पिकअप टेम्पो (क्रं.एम.एच.१७ ए.जी.७६०६),प्लॅस्टिकचे प्रत्येकी २५० लिटर क्षमतेचे चार मोठे बॅरल,त्यात १ हजार डिझेल,एक बुडाला छिद्र पडलेला काळ्या रंगाचा ड्रम,३० लिटर डिझल,एक अर्धा इंच व्यासाची प्लॅस्टिकची जुंनी वापरती नळी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या आरोपींना शहर पोलिसानी कोपरगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या संमोर उभे करून त्याना पोलीस कोठडी सुनावली आहे.त्या आरोपीना पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी त्यांच्या पथकाने चोवीस तासाच्या आत अटक केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.