जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेच्या विकास कामांना पुन्हा एकदा कोलदांडा!

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव नगरपरिषदेच्या काल सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान संपन्न झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्या कोल्हे गटाने पुन्हा एकदा आपला नकारात्मक दृष्टिकोन दाखवून देऊन २८ विकास कामांना विकास कामांना खो घातल्याने संतप्त झालेल्या नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पत्रकार परिषदेचे आयोजन करून भाजपच्या (माजी आ.कोल्हे गटाच्या) सभापती व नगरसेवकांवर हा निवडणुकीत विकास कामे दिसू नये म्हणून कोलदांडा घातल्याचा आरोप केला आहे.त्या मुळे हा शिमगा आता निवडणुकीपर्यंत सुरु राहणार हा आमच्या प्रतिनिधीने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरत असल्याचे मानले जात आहे.

आजपर्यंत कुठल्याही नगराध्यक्षांचा काळात एवढे कामे झाली नसल्याचा पूर्वीच्या नगराध्यक्ष यांच्या कामाचा आदर राखून दावा केला आहे.खरेतर शहरातील हे प्रमुख रस्ते आहे व ते झाले तर शहर पूर्ण चकाचक दिसेल हि भीती त्यांना सतावत असल्याने त्यांनी हा विरोध चालवला असून त्यांना या कामी यश मिळणार नाही-विजय वहाडणे,नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.

कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थायी समितीची बैठक दि.१२ जानेवारी रोजी नगरपालिका सभागृहात संपन्न झाल्या नंतर राष्ट्रवादीने स्थायी समितीत सोळा कामांना विरोध केल्या प्रकरणी आंदोलन छेडले होते.व घरोघरी पत्रके वाटून कोल्हे गटाचा शिमगा साजरा केला होता.त्याला उत्तर म्हणून कोल्हे गटानेही शहरात पत्रके वाटून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या होत्या.व त्या नंतर नगराध्यक्ष वहाडणे यांनी २८ पैकी १६ कामे मंजूर करून आमच्या प्रभागातील नगरसेवकांची कामे टाळल्याचा आरोप करून सर्वच्या सर्व २८ कामे मंजूर करावे अशी मागणी केली होती.व ती सर्व कामे पटलावर ठेवल्यावर त्यास मंजुरी देऊ असे आश्वासित केले होते.त्यानंतर काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव नगरपरिषेदेने नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभेचे आयोजन केले होते.त्या सभेत सर्वच्या सर्व कामे मंजुरीसाठी ठेवूनही कोल्हे गटाने पुन्हा एकदा कोलदांडा घातल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.या सभेत कोल्हे गटाचे सर्वच्या सर्व विषय समित्यांचे सभापती,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आदींसह सर्व विभागाचे विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.हे विशेष !

या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी या सभेचा आढावा घेऊन आज कोल्हे गटावर शरसंधान साधले आहे.त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”आपण या प्रश्नी अजून एक सर्वसाधारण सभा बोलावणार असून त्यातही विरोध झाला तर आपण सरळ जिल्हाधिकारी यांचेकडून या विषयी मंजुरी घेऊन पुढील विकास कामे सुरु करू.मात्र आगामी सभेत हि मंडळी नक्कीच विकास कामांना साथ देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई यांच्या काळात व गत चार वर्ष जीवन प्राधिकरण यांचेकडून अंदाजपत्रके बनवले तर चालले मात्र आता निवडणूक जवळ आल्याने त्यांना कावीळ झाली असून त्यांनी विकास कामांना विरोध करून जनतेप्रती असलेली आपली खरी ओळख दाखवून दिली आहे.आम्ही या विकास कामात कन्सल्टन्सी फिवर दोन टक्क्या ऐवजी केवळ १.८४ टक्के लावलेला असताना त्यांनी त्याला हरकत घेतली आहे.या पूर्वी हे सर्व चालत होते.हे वहाडणे यांनी सोदाहरण पटवून दिले आहे.आपत्कालीन कामाचा निधी हि तरतूद प्रत्त्येक कामात अंतर्भूत असेही निदर्शनास आणले आहे.शिवाय जेवढे काम होईल तेव्हढेच बिल रेकॉर्ड होत असल्याची बाब निदर्शनास आणली आहे.त्यामुळे हे कोल्हे गटाचे आरोप म्हणजे कोल्हेकुई असल्याचे सांगितलें आहे.व आजपर्यंत कुठल्याही नगराध्यक्षांचा काळात एवढे कामे झाली नसल्याचा पूर्वीच्या नगराध्यक्ष यांच्या कामाचा आदर राखून दावा केला आहे.खरेतर शहरातील हे प्रमुख रस्ते आहे व ते झाले तर शहर पूर्ण चकाचक दिसेल हि भीती त्यांना सतावत असल्याचा दावा केला आहे.आज पालिकेत जेवढे ठेकेदार आहे त्यातील ९५ टक्के हे कोल्हे गटाचे असल्याचा दावा केला आहे.काही पदाधिकारी व नगरसेवक आपल्याला भेटले व त्यांनी या विकास कामांना विरोध करणाऱ्या मानसीकतेचा निषेध केला असून याबाबत कोल्हे गटातील अनेक नगरसेवक सर्वसधारण सभेत या प्रवृत्तीला विरोध करणार असल्याचा दावा केला आहे.व त्यांच्यात वादावादी झाली असल्याची खबर दिली आहे.तर काही पदाधिकारी हे ठेकेदारांना दम देऊन आपल्याला का भेटत नाही म्हणून धमक्या देत असून टक्केवारीसाठी त्रास देत असल्याची बाब निदर्शनास आणली आहे.आपण शहरात विकास कामे केली पण प्रसिद्धी केली नाही.त्यामुळे कोल्हे गटाचे काही विघ्नसंतोषी मानसिकता असलेले पदाधिअकारी व नगरसेवक आपली बदनामी करत असल्याचा आरोप केला आहे.खुले नाट्यगृहाचे काम होणे हि बाब नवीन व जुन्या कलाकारांसाठी महत्वाची असताना त्याला विरोध केला जात असल्याबद्दल त्यांनी या प्रवृत्तचा निषेध केला आहे.व हि विकास कामे कुठल्याही परीस्थितीत थांबणार नाही असा दावा केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close