जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

मोबाईलचे पैसे मागितले,कोपरगावात दुकानदारास मारहाण

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील येवला रोड लागत असलेल्या के.जी.एन.या मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानदाराने आपल्या मोबाईल विक्रीचे पैसे मागीतल्याचा राग येऊन आरोपी परवेज इक्बाल शेख,इक्बाल शेख,परवीन इक्बाल शेख,फरदीन इक्बाल शेख,अरबाज ( पूर्ण नाव माहीत नाही) आदींनी त्यास विटाने मारहाण करून त्यास जखमी केल्याची फिर्याद मेहताब मेहबूब अन्सारी यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी दुकानदार याने आरोपी परवेज शेख याचे कडे दि.१९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उधारी मागितली त्याचा आरोपी परवेज शेख यास राग आला व त्याने हातात एक विट घेऊन ती फियादी मेहताब अन्सारी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले आहे.

कोपरगाव शहरातील येवला रोड लगत फिर्यादी मेहताब मेहबूब अन्सारी (वय-२५) रा.बँक कॉलनी कोपरगाव यांचे दुकान असून या दुकानात ते आपले मोबाईल विक्री करतात.त्यांनी आरोपी परवेज शेख यास मोबाईल विकला होता.व त्याची उधारी असल्याने फिर्यादी दुकानदार याने आरोपी परवेज शेख याचे कडे दि.१९ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उधारी मागितली त्याचा आरोपी परवेज शेख यास राग आला व त्याने हातात एक विट घेऊन ती फियादी
मेहताब अन्सारी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले आहे.तर अन्य आरोपी इक्बाल शेख,परवीन इक्बाल शेख,फरदीन इक्बाल शेख,अरबाज ( पूर्ण नाव माहीत नाही) यांनी साक्षिदार यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात वरील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३०/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,४५२,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केवळ आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close