आरोग्य
ध्यानधारणेने अनेक ताण कमी होतात-चैताली काळे
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ध्यानावस्थेत अल्फाप्रवाह वाढतात म्हणून काळजी-ताण कमी होतो.मनोविज्ञानाचे निकष लावल्यास,ताण-काळजी व तत्सम मनोविकार आणि समस्या यांच्या मुळाशी अनेक कारणे असली तरी अनेक मनोविकार कमी होण्यास ध्यानधारनेचा उपयोग होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
जे तुम्हाला गाढ विश्रांती देते ते आहे ध्यान.ध्यान अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये साधक बसतो आणि मनाला हरवतो.आर्ट ऑफ लिविंगमधील ध्यान अशी साधी सोपी क्रिया आहे जे कोणीही करू शकतात.
महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा येथील होनल इन्चार्ज राजयोगिनी संतोषदीदी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या महाराष्ट्र संचालिका यांना गोवा राज्याकडून ग्लोबल कौन्सिल फॉर प्रोफेशनल एज्युकेशन मिशनच्या माध्यमातून डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल चैताली काळे व कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.तसेच ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा कोपरगाव येथे नवनिर्मित वाढीव सत्संग हॉलचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी चैताली काळे बोलत होत्या.
याप्रसंगी राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदी,ब्रह्माकुमारी सरला दीदी,कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे,शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संतोष चवंडके,नगरसेवक मंदार पहाडे,मेहमूद सय्यद,परमपूज्य ह.भ.प.उंडे महाराज,राजेंद्र वाकचौरे,डॉ.रामदास आव्हाड,डॉ.महेंद्र गोंधळी,डॉ. कापडणीस,डॉ.नाईकवाडे,अशोक आव्हाटे,नारायण लांडगे,योगेश नरोडे,चंद्रशेखर म्हस्के,रश्मीताई कडू,आदी उपस्थित होते.